एक्स्प्लोर

कारखानदार अगोदर बगलबच्च्यांचा ऊस नेतात, सर्वसामान्यांचा ऊस जाळून जातो; राजू शेट्टींचा प्रहार 

राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

Raju Shetti : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते ऐकमेकावंर आरोप प्रत्यारोप करत आहे. अशातच हातकणंगले लोकसभा (Hatkanagle Loksabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण देखील चांगलच गरम झालं आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. शिरसीमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस कधी जाळून गाळपास नेलाय का?

माझ्या विरोधात साखर कारखानदार लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत. पण बिले द्यायचे नाव काढत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस या लोकांनीच वाळवलेला आहे. कारण यांच्याकडे टोळ्या कमी आहेत. तोडणी यंत्रणा कमी आहे. बहुसंख्या टोळ्या पळून गेल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळून न्यायला लावतात. एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास गेलेले एक उदाहरण असेल तर मला द्या असेही शेट्टी म्हणाले. सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांची ऊस जाळून कारखान्याला जातो. यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होते असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे

माझ्यावर काही महाभाग टीका करत आहेत की, राजू शेट्टी यांनी आंदोलन केले म्हणून ऊसाच्या तोडण्या उशीरा सुरू झाल्या. फेब्रुवारीनंतर दरवर्षी साखर कारखानदार ऊस जाळूनच नेतात. त्यात सभासद नसला की टनाला 300 रुपये कमी करतात. यामधूनही पण शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरच शेतकरी चळवळ टिकणार आहे असं राजू शेट्टी म्हणाले. आपण देशाला अन्नधान्य पुरवतो. मात्र शेतकरी उपाशीची आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाल्यास शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील युवकांना रोजगारासाठी मुंबईला जायची गरज भासणार नाही. यासाठी मला एमएसपीचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी संसदेत जायचे आहे असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार 

शिराळा तालुका हा दुर्गम भाग आहे. ऊसाबरोबरच इतर पिके देखील याठिकाणी घेतली जातात. येथील शेतकऱ्यांची गुंट्याची शेती आहे. शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही. मिळतो तो केवळ शेतीमधूनच. त्यासाठी लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतीमालाला दर मिळावा म्हणून गेली 30 वर्षे मी संघर्ष करतोय. मी खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडलेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अधिकर 2018 या दोन विधेयकांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मला संसदेत जाऊन ती विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे शेट्टी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींच्या एकूण संपत्तीत आणि कर्जातही वाढ; एकूण किती कोटींची संपत्ती?

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget