kolhapur municipal corporation : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत कोल्हापूर मनपाकडून (kolhapur municipal corporation) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


या अंतर्गत उद्या सकाळी 11 वाजता ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. महापालिका कर्मचारी तसेच सर्व नागरिकांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायबर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेंद्र जोशी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ वर मार्गदर्शन करणार आहेत. 


फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यान पाहता येईल 


ऑनलाईन फसवणूक, ब्लॅकमेलिंग,आर्थिक फसवणूक,मोबाईलचा अतिवापराचे आरोग्यावर होणारे परिणाम, मुलांच्या अभ्यासावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे फेसबुक पेज www.facebook.com/KolhapurCorporation वर भेट देऊन फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कोल्हापूर मनपाकडून ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत मनपाकडून कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक स्थळांची व कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता मोहिम सर्व खातेप्रमुखांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेच्या (kolhapur municipal corporation) मुख्य इमारतीमधील कार्यालये, विभागीय कार्यालये, छत्रपती शिवाजी मार्केटमधील कार्यालये, आरोग्य विभागाची कार्यालये, सर्व फायर स्टेशन यांची कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. 


आरोग्य विभागामार्फत शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, एैतिहासिक पाण्याचा खजिना परीसर, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान व राधाकृष्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहिम विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, मुकादम व महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केली. (kolhapur municipal corporation)


इतर महत्त्वाच्या बातम्या