Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने गेल्या 24 तासांपासून उसंत घेतली आहे. तथापि, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ अजूनही सुरुच आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुट 7 इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील  73 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्यमार्गांवर पाणी आले आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. 7 राज्यमार्गांवर 12 ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख 24 मार्गावर 26 ठिकाणी पाण्याचा विळखा आहे. 


बावडा शिये मार्गावर पाणी 


दरम्यान, पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने सुतारमळ्यातील 61  कुटुंबांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. दुसरीकडे पंचगंगा नदी पात्र विस्तारत चालल्याने पुराचे पाणी बावडा शिये मार्गावर पाणी आले आहे. रस्त्यावर जवळपास दीड फुटापर्यंत पाणी आले आहे.


राधानगरी धरण भरले


गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने राधानगरी पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, काल चारपैकी 3 नंबरचा काल रात्री बंद झाला. 


बावडा शिये मार्गावर पाणी 


दरम्यान, पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने सुतारमळ्यातील 16  कुटुंबांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. दुसरीकडे पंचगंगा नदी पात्र विस्तारत चालल्याने पुराचे पाणी बावडा शिये मार्गावर पाणी आले आहे. रस्त्यावर जवळपास दीड फुटापर्यंत पाणी आले आहे.


चिखली, आंबेवाडीमधील 500 कुटुंबांचे स्थलांतर 


पुराच्या पाण्याचा वेढा वाढत चालल्याने करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावामध्ये दक्षतेचा उपाय म्हणून 500 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या दोन्ही गावात अजून पाणी आलेले नाही.


इचलकरंजीत पंचगंगेची पातळी 64 फुटांवर


 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीची पाणी वाढत चालली आहे. इचलकरंजीमध्ये पाणी पातळी  तब्बल 64 फुटांवर गेली आहे. जुन्या पुलावर पाणी आल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  


जिल्ह्यात एसटी बंद असलेले मार्ग



  • कोल्हापूर ते गगनबावडा

  • इचलकरंजी ते कुरुंदवाड 

  •  गडहिंग्लज ते ऐनापूर 

  • मलकापूर ते शित्तूर

  •  चंदगड ते दोडामार्ग

  • गगनबावडा ते करुळ घाट 

  • आजरा ते देव कांडगाव