Vishalgad Fort : असदुद्दीन ओवैसी आम्ही तुमची वाट पाहत आहोत, आम्हाला भेटल्याखेरीज जाऊ नका; विशाळगड संवर्धन समितीचे आवाहन
Asaduddin Owaisi : मजलिस इत्तेहादूल मुसलेमीन’चे (MIM) खासदार असदुद्दीन ओवैसी तुमची आम्ही वाट पाहत आहोत, आम्हाला भेटल्याखेरीज जाऊ नका, असे आवाहन विशाळगड संवर्धन समितीचे हर्षल सुर्वे यांनी केले आहे.
Vishalgad Fort : मजलिस इत्तेहादूल मुसलेमीन’चे (MIM) खासदार असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) तुमची आम्ही वाट पाहत आहोत, विशाळगडावर सुरू असलेल्या काळाबाजाराची माहिती घ्या आणि आम्हाला भेटल्याखेरीज जाऊ नका, असे आवाहन विशाळगड संवर्धन समितीचे हर्षल सुर्वे यांनी केले आहे. ओवैसी यांनी विशाळगडला भेट देणार असल्याचे म्हटल्यानंतर समितीकडून हर्षल सुर्वे यांनी आवाहन केलं आहे. गडावर झालेल्या अतिक्रमणामुळे विशाळगड (Encroachment On Vishalgad) चर्चेत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापुरात शिवप्रेमी व गडप्रेमींकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. याच मुद्यावरून संभाजीराजे छत्रपती आणि आमदार विनय कोरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते.
महाशिवरात्रीवेळी गडावर आतषबाजी झाल्यानंतर ती दर्गाहच्या दिशेने झाल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर सुर्वे यांनी म्हटले आहे की, तुम्ही गडावर येणार असल्याचे कळाले आहे. महाशिवरात्रीला झालेल्या केवळ आतषबाजीची तुम्ही माहिती घेऊ नका. दर्गाच्या परिसरात थाटलेल्या दुकानांची माहिती घ्या. येथील दुकानांतून मद्य, गांजाची विक्री होते, तेही जाणून घ्या. काळाबाजाराची माहिती घ्या. हा छत्रपती शिवरायांचा गड आहे. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. जेव्हा याल तेव्हा जरूर भेटा. आमची भेट घेतल्याखेरीज जाऊ नका.
अतिक्रमण काढण्यासाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर
दरम्यान, किल्ले विशाळगडावरील (Encroachment On Vishalgad) संरक्षित स्मारकावरील अतिक्रमणे काढण्यासाठी 1 कोटी 17 लाखांचा निधी खर्चास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाकडे अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गडावरील अतिक्रमण काढण्याबाबत संपर्क केला होता. त्यानुसार अतिक्रमण काढण्यासाठी लागणार अंदाजित खर्च सादर केला होता. त्यानुसार निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. विशाळगडावरील (Vishalgad Fort) अतिक्रमणे हटवण्याबाबत 7 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. यामध्ये, किल्ल्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणे, बांधकाम आणि इतर कृत्याबाबत प्रतिबंध करावा, संबंधितांवर फिर्याद दाखल करावी. तसेच सक्षम न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय झाला. कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना आदेश दिले होते.
दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन निविदा मागवण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या