एक्स्प्लोर

MP Nilesh Lanke on Sujay Vikhe Patil : मांजराने वाघाचं झुल घातलं म्हणजे वाघ होतं नसतो, ते जनतेनं ठरवायचं असतं; खासदार निलेश लंकेचा सुजय विखेंवर हल्लाबोल

बेरोजगारी शेतकरी तरुणांच्या मुद्द्यांवर विचार करणारे सरकार राज्यांमध्ये स्थापन होईल. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

MP Nilesh Lanke on Sujay Vikhe Patil : खरा वाघ कधी सांगत नसतो, मी वाघ आहे. म्हणून नगरमधील जनतेने ठरवलं आहे कोण वाघ आहे. त्यामुळे मांजराने वाघाचा झुल पांघरलं म्हणजे तो वाघ होत नसतो ते जनतेने ठरवायचं असतं, अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. खासदार निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंबाबाई मंदिरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे

खासदार निलेश लंके यांनी आगामी निवडणुकीच्या निवडणुकीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात बळीराजाचे म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्यांमध्ये बदल अटळ असल्याचा दावा सुद्धा निलेश लंके यांनी केला. ते म्हणाले की बेरोजगारी शेतकरी तरुणांच्या मुद्द्यांवर विचार करणारे सरकार राज्यांमध्ये स्थापन होईल. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की शरद पवार साहेबांकडे गेलो की आपण निवडून येऊ शकतो असं वाटत असल्याने आमच्याकडे सर्वाधिक इनकमिंग होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांचा सर्वाधिक स्ट्राईक होता, असेही त्यांनी सांगितले. 

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता

दरम्यान, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता आज इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या सभेला शरद पवार यांच्या बरोबर  सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना राष्ट्रवादीची ही सांगता सभा म्हणजे  राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातील प्रचाराचा एकप्रकारे प्रारंभ करणारी सभा असणार आहे. 

राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे रोजगार, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी त्यांनी लोकांसमोर मांडून भ्रष्ट सरकारच्या भोंगळ कारभार यात्रेतून मांडण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.  9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूरपर्यंत 24 दिवस पूर्ण झाले. शिवस्वराज्य यात्रा या 24 दिवसात 19 जिल्हे पूर्ण केले. यात्रेसाठी तब्बल 7365 किलोमीटरचा प्रवास केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघात केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा असलेल्या शिंगणेंकडून पवारांचीच खिल्ली ?Aaditya Thackeray : शिंदेंसाठी सबका मालिक अदानी; आदित्य ठाकरेंची टीकाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2PM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 2 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
DA Hike : केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी, महागाई भत्ता वाढवण्याचा केंद्राचा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
चंद्रकांत पाटील कोथरुडमधून रिंगणात, भाजपचे पहिले 10 मतदारसंघ ठरले, 2 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब: सूत्र
चंद्रकांत पाटील कोथरुडमधून रिंगणात, भाजपचे पहिले 10 मतदारसंघ ठरले, 2 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब: सूत्र
Manoj Jarange Patil on Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, जरांगेंनी समजून घ्यावं, जरांगे म्हणाले, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदाच आहे का?
मुख्यमंत्री म्हणाले, जरांगेंनी समजून घ्यावं, जरांगे म्हणाले, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदाच आहे का?
Eknath Shinde: ‘लाडकी बहीण योजने’ला हात लावला तर करेक्ट कार्यक्रम…एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
‘लाडकी बहीण योजने’ला हात लावला तर करेक्ट कार्यक्रम…एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
Embed widget