एक्स्प्लोर

Raj Thackeray In Kolhapur : राज ठाकरे पाच वर्षांनी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; जोरदार स्वागतासाठी जय्यत तयारी

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल पाच वर्षानंतर मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असतील.

Raj Thackeray In Kolhapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे तब्बल पाच वर्षानंतर मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी 4 वाजता ते आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊस येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ते मनसे समर्थकांशी संवाद साधतील आणि शासकीय सर्किट हाऊसमध्ये येणार्‍या जुन्या मित्रांना भेटतील.

दुसऱ्या दिवशी बुधवारी राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील. कोकण दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ते सावंतवाडीकडे रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी येथे पोहोचतील. कुडाळ येथे मुक्काम असेल. राज ठाकरे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत‌. 

स्थानिक पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे मुद्दे, संघटनात्मक समस्या आणि जिल्ह्यातील पक्षाची स्थिती याबाबत तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे कार्यकर्ते ठाकरे यांना स्वतंत्रपणे किंवा पक्षाच्या संभाव्य नवीन मित्र भाजपसोबतच्या युतीसह निवडणुका लढवण्याची परवानगी देण्यास सांगतील. पक्षाचे कार्यकर्ते त्यांना निवडणुकीपूर्वी जाहीर सभेला संबोधित करण्याची विनंती करतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील मनसैनिकांना ते काय कानमंत्र देणार? याकडे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरेंकडून निवडणुकीचं भाकित

दरम्यान,राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात लवकरच कोणत्या निवडणुका होणार आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. "मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय," असं राज ठाकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget