एक्स्प्लोर

Maharashtra Ekikaran Samiti Agitation : महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन, बेळगाव सीमवासिय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटणार

Maharashtra Ekikaran Samiti Agitation : बेळगावमधील सीमावासीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज (26 डिसेंबर) कोल्हापुरात येऊन धरणे आंदोलन करणार आहे.

Maharashtra Ekikaran Samiti Agitation : बेळगावमधील (Belgaon) सीमावासीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) नेतृत्वाखाली आज (26 डिसेंबर) कोल्हापुरात (Kolhapur) येऊन धरणे आंदोलन करणार आहे. कर्नाटक सरकारकडून (Karnatak Government) सुरु असलेल्या दडपशाहीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलावीत, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) पेटलेला असतानाच आता महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापुरात धरणे आंदोलन करणार आहे.  

दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून कोल्हापुरात

बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला परवानगी नाकारुन दडपशाही करुन पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आज कोल्हापूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरला धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून जाणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने एक दिवस बंद करावा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मत

महाराष्ट्र एकीकरण समितीची 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेऊन कोल्हापूरला जाऊन धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावात आंदोलन केले तर कर्नाटकचे पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार, यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला जाऊन आंदोलन करावे अशी इच्छा बैठकीत व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असं मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या नावे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येणार आहे. 

पोलीस महासंचालकांकडून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड संघटनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक

कर्नाटकचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड संघटनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेतली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली होती. आंदोलनासाठी प्रत्येक वेळी तुम्ही परवानगी मागता आम्ही तुम्हाला परवानगी देतो. सध्या बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन काळात कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत, असं आलोक कुमार यांनी बैठकीत सांगितलं. बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर यांनी मराठी भाषिकांच्या भावना मांडल्या. कन्नड संघटनेचे नेतेही बैठकीला उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणीMumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रमMumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget