Madhuri Elephant : महादेवी हत्तीनीला इस्माईल चाचानी पोटच्या लेकरासारखं वाढवलं; निरोप देताना गळ्यातल्या टॉवेलने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले, ते दृश्य पाहून...
Madhuri Elephant : नांदणी मठात राहणारी माधुरी हत्तीण सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये माधुरी देखील रडताना दिसते.

कोल्हापूर: कोल्हापूर मधील नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला निरोप देताना प्रचंड जनसागर उसळला होता. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात असलेल्या नांदणी गावामध्ये ही महादेवी हत्तीण राहत होती. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ही माधुरी नावाने ओळखली जाणारी हत्तीण जैन समाजाच्या मंदिरामध्ये आनंदाने राहत होती. अगदी लहान असल्यापासून तीच मंदिरामध्ये वास्तव्य होतं, महादेवी उर्फ माधुरी हिला मंदिरातील पुजाऱ्यांनी, भाविकांनी आणि गावकऱ्यांनी जीव लावला होता. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत माधुरी सर्वांचीच लाडकी होती. ती फक्त एक प्राणी म्हणून नाही तर मंदिराच्या आवारातील एक महत्त्वाचा घटक म्हणून तिच्यावपती सर्वजण प्रेम, माया करत होते. मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये भावनांनी अखेर हार मानली. मनावर दगड ठेवून सर्वांनीच लाडक्या माधुरीची पाठवणी केली.
तिला डोळे भरून पाहण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला
पाठवणी करण्याआधी तिला डोळे भरून पाहण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता. तिची मिरवणूक काढण्यात आली, केक देखील कापला, तिला ओवाळलं, तिला भरभरून आशीर्वाद दिले, यावेळी तिला हात लावत सर्वांनी तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. काहींना तिला पाहताच अश्रू अनावर झाले, सर्वांनी तिला नेऊ नये अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, कायद्यापुढं सर्वांच्या भावनांना देखील हार मानावी लागली, कोर्टाच्या निकालानंतर कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातच्या वनतारामध्ये करण्यात आली आहे. तिच्या पाठवणीआधी तिची मिरवणूक काढली यावेळी तिचा माहुत इस्माईल चाचा यांनी तिला एकटीला कुठेही सोडलं नाही. मिरवणुकीवेळी ज्याप्रमाणे सर्वांना अश्रू अनावर झाले त्याचप्रमाणे माधुरी देखील तिच्या भावना डोळ्यातून व्यक्त करताना दिसली. तिचे डोळे देखील पाणावले होते, यावेळी माहुत इस्माईल चाचानी तिचे गळ्यातल्या टॉवेलने डोळे पुसले.
तिचे डोळे पुसतानाचा व्हिडीओ व्हायरल
माधुरीला निरोप देण्यासाठी सर्व गाव जमला होता, बाहेरच्या गावातील लोकही तिथं आले होते, त्यावेळी माधुरीला देखील अश्रू अनावर झाले. त्यावेळी इस्माईल चाचानी आपल्या गळ्यातल्या टॉवेलने तिचे डोळे पुसले. त्यानंतर त्यांनाही अश्रू अनावर झाले. अगदी आपल्या लेकराप्रमाणे जपलेल्या माधुरीला अशा प्रकारे दुसऱ्यांच्या हवाली करताना चाचाही धाय मोकलून रडले. हे दृश्य पाहणारा देखील हळहळला.
नेमकं प्रकरण काय?
नांदणीच्या मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला आहे. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली.
कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ नाराज
दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झाले. कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठात मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलं आहे. हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं, मात्र तिथही त्यांना निराशा मिळाली होती.
View this post on Instagram
























