(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna Crime : अश्लील व्हिडिओ करून तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवले; कोल्हापुरातील तरुणाविरोधात जालन्यात गुन्हा दाखल
स्नॅपचॅटवरून ओळख झाल्यानंतर अश्लील व्हिडिओ करून तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली. दरम्यान, या घटनेनंतर या प्रकरणात पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार केली.
Jalna Crime : स्नॅपचॅटवरून ओळख झाल्यानंतर अश्लील व्हिडिओ करून तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली. दरम्यान, या घटनेनंतर या प्रकरणात पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार केली. हा संशयित तरुण हा कोल्हापूरचा (Kolhapur crime) आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपीची स्नॅपचॅटच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर कोल्हापूरच्या संशयित आरोपीने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ केले होते. दरम्यान, सदर मुलीचे लग्न जमल्याचे कळताच त्याने पीडित मुलीच्या होणाऱ्या पतीला अश्लील व्हिडिओ पाठवून दिले होते. त्यामुळे पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.
महिला पोस्ट मास्तरने लग्नास नकार दिल्याने चारित्र्यहननचा प्रयत्न!
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात महिला पोस्टमनने लग्नास नकार दिल्यानंतर चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न चिपळूण तालुक्यातील सहाय्यक पोस्ट मास्तरने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पीडित महिला पोस्टमनला याबाबत माहिती समजल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर डाक सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महाभागाने महिलेच्या कार्यालयात जाऊन डाक सहाय्यकाने चारित्र्यहननचा प्रयत्न केला.
संशयित डाक सहाय्यक शिरगाव (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील आहे. तो डाक सहाय्यक 20 ऑक्टोबर रोजी चंदगड पोस्ट कार्यालयात कामाचे कारण काढून आला होता. या ठिकाणी आल्यानंतर पीडित महिला पोस्टमास्तरकडे लग्न झालं आहे की नाही? याची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी कुटुबीयांकडून याबाबत स्थळ पाहणीचे काम सुरु असल्याची माहिती त्या महिला पोस्ट मास्तरने त्याला दिली. त्यानंतर डाक सहाय्यकाने तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असल्याचे म्हणाला. डाक सहाय्यकाला महिला पोस्टमास्तरने समजावून सांगताना त्याला नकार दिला. त्यानंतरही संशयित डाक सहाय्यकाने मोबाईलवरुन फोन करुन जवळीकीचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने, तुझे लग्न कसे ठरते ते बघतो, अशी धमकी दिली. त्यानंतर संशयिताने संबंधितांचे नंबर मिळवून त्यांच्याकडे संबंधित महिलेचे चारित्र्यहनन होईल, असे संभाषण केले. याची माहिती पोस्टमनने त्या पीडित महिलेला दिल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली.
इतर महत्वाच्या बातम्या