(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kumbhi Sakhar Karkhana Election : कोल्हापुरातील कुंभी-कासारी साखर कारखान्यासाठी चुरशीने 82.45 टक्के मतदान; निकालाची उत्सुकता शिगेला
Kumbhi Kasari Sakhar Karkhana Election : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुडित्रेतील कुंभी-कासारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 82.45 टक्के मतदान झाले.
Kumbhi Kasari Sakhar Karkhana Election : कोल्हापूर (kolhapur News) जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुडित्रेतील कुंभी-कासारी साखर कारखाना (Kumbhi Sakhar Karkhana Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी 82.45 टक्के मतदान झाले. कारखान्याच्या 23 हजार 431 पैकी 19 हजार 319 मतदारांनी आपला हक्क बजावला. उद्या मंगळवारी (14 फेब्रुवारी) कसबा बावड्यातील रमणमळात 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. कुंभी कारखान्यामध्ये चंद्रदीप नरके यांची एकहाती सत्ता आहे.
कारखान्याच्या (Kumbhi Sakhar Karkhana Election) 23 जागांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात सत्ताधारी नरके पॅनेलमधून 23 उमेदवार, तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलमधून गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेले पंधरा दिवस कार्यक्षेत्रात प्रचाराचा धुरळा उडाला होता. कारभारावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. निवडणूक चुरशीची असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोपार्डे, वाकरे, पाडळी खुर्द, कोगे, शिंगणापूर, कुडित्रे या ठिकाणी ईर्षेने मतदान झाले.
दोन्ही गटाकडून विजयाचा दावा
संपूर्ण 23 उमेदवार विजयी होतील, असा दावा नरके पॅनेलच्या वतीने केला आहे. विरोधी आघाडीकडून कारखाना आर्थिक अडचणीत आहे, कारखान्याचे खासगीकरण होईल, ते होऊ देणार नाही, यासाठी सभासद आमच्याबरोबर आहेत, असे म्हणत आमचे 23 उमेदवार विजयी होतील, असा दावा विरोधी शाहू आघाडीने केला आहे.
सतेज पाटील आणि चंद्रदीप नरके कोपार्डेत एकत्र
सतेज पाटील (satej Patil) यांनी कारखाना निवडणुकीत ((Kumbhi Sakhar Karkhana Election) आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नसली, तरीही त्यांचे कायकर्ते प्रचारात होते. मतदानास सतेज पाटील यांनी कोपार्डेत संस्था गटातून मतदान केले. यावेळी चंद्रदीप नरके यांच्यासोबत मतदान केंद्रावर आले. बघता बघता हा दोन्ही नेते एकत्र आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
दरम्यान, वाकरेत मतदानानंतर एका एसटीमधून एकच मतपेटी कर्मचारी घेऊन जात असताना शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गाड्या पाठवून रमणमळा इथेपर्यंत कार्यकर्ते एसटीबरोबर गेले. दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चेतन नरके इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरुन चर्चा रंगली आहे. अरुण नरकेंची भूमिका विरोधी आघाडीला विजयी बळ देणार का? अशीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, आमदार माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स. ब. खाडे महाविद्यालय येथे मतदान केले. मांडुकलीत सर्वसाधारण गटातून मतदान केले. त्यांनी उघडपणे नरके पॅनेलला पाठिंबा दिलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या