Majha Impact: पुणे-बंगळूर महामार्गाच्या रुंदीकरणाचा भराव थांबवला, कोल्हापूरला महापुराचा बसणार होता फटका
कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला महामार्ग जबाबदार असल्याची एबीपी माझाने दाखवली बातमी होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने काम थांबवल्याचे ग्रामस्थांना पत्र देण्यात आले आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात 2019 साली पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीनं (Panchganga River) पात्र सोडून शहराकडे धाव घेतली आणि पुढे सगळा हलकल्लोळ माजला. मात्र या सर्वाला कारणीभूत ठरणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर रुंदीकरणाच्या दरम्यान टाकण्यात येणारा भराव थांबवला आहे. एबीपी माझाच्या बातमीचा 24 तासाच्या आत इम्पॅक्ट झाला आहे. भराव टाकून रुंदीकरण केलं असतं तर कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसणार होता.
कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला महामार्ग जबाबदार असल्याची एबीपी माझाने दाखवली बातमी होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने काम थांबवल्याचे ग्रामस्थांना पत्र देण्यात आले आहे. महामार्गाला कमानी उभा करण्यासंदर्भातला प्रस्ताव दहा दिवसात पाठवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1300 पूरग्रस्त गावांनी भराव टाकून काम करण्यास विरोध दर्शवला होता.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असणारा हा पुणे-बंगळुरू महामार्ग एखाद्या धरणाच्या भिंतीप्रमाणे काम करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळी महापुराला त्या त्यावेळी त्या महामार्गाचा आवर्जून उल्लेख होतो.
2005, 2019 आणि 2021 च्या महापुरावे 40% शहर पाण्याखाली
पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहराला वळसा घालून पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वाहते. त्याचवेळी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा हा महामार्ग भराव टाकून बांधण्यात आला. त्यामुळे नदीचे पाणी वाहून जाण्याऐवजी भरावामुळे अडवले गेले. आता या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू झाले आणखी भराव टाकून हा महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाला अजिबात विरोध नाही मात्र कमानी उभा करून पंचगंगा नदीचे पाणी विना अडथळा पूर्वीच्या दिशेने जाईल अशी व्यवस्था करण्याची मागणी होती. या महामार्गाचा सगळ्यात पहिल्यांदा फटका कोल्हापूर शहराला बसतो. महामार्गाला अडलेलं पाणी थेट शहरात घुसतं. 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरावे 40% शहर पाण्याखाली गेले होते. शिवाय पंचगंगा नदी काठावरची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळेच महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कमानी बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला बसत असल्याचा निष्कर्ष
कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा आणि पर्यटनाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडच्या दिशेने वाहत असतात. त्याचवेळी या महामार्गाचा अडथळा त्यांना निर्माण होतो. त्याचाच फटका कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला बसत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. 2019 आणि 2021 या दोन्ही वर्षी आलेल्या महापुराच्या दरम्यान एबीपी माझाने हा मुद्दा लावून धरला होता.