एक्स्प्लोर

Kumbhi Sakhar Karkhana Election : चेतन नरके तुम्ही राजकीय आत्महत्या केली; कारखाना निवडणुकीत पत्रातून मतदारांनी व्यक्त केला संताप

कुंभी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी चंद्रदीप नरके गटाने चौथ्यांदा मारली. त्यांनी एकतर्फी विजय मिळवताना सर्व 23 जागांवर विजय मिळवला.

Kumbhi Sakhar Karkhana Election : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुंभी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी चंद्रदीप नरके गटाने चौथ्यांदा मारली. त्यांनी एकतर्फी विजय मिळवताना सर्व 23 जागांवर विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने नरके कुटुंबातील कलह समोर आला आहे. कुंभी कारखाना निवडणुकीमध्ये अरुण नरके आणि चेतन नरके यांनी विरोधी गटाला रसद पुरवली. मात्र, हे सभासदांना रुचलेलं नसल्याचे समोर आलं आहे. कारण मतपेटीमध्ये मतदान करताना काही पत्र देखील टाकण्यात आली. यामध्ये चेतन नरके यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर आमदार पी. एन. पाटील यांना तुम्ही तुमच्या भोगावती कारखान्याचे पहा अशी सूचनाही मतपेटीतून दिली आहे.

चेतन नरके तुम्ही राजकीय आत्महत्या केली

चेतन नरके आणि संदीप नरके यांनी योग्य केलं नाही, भावाला खाली खेचण्यासाठी आजोबांना शिव्या देणाऱ्यांना पाठिंबा दिला. चेतन नरके तुम्ही राजकीय आत्महत्या केली आहे. राजकारणात चंद्रदीप नरके हाच वाघ आहे. खासदारकीच्या हव्यासापोटी रक्ताची नाती तोडली आहात. परंतु, कोल्हापूरमध्ये खासदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार आहे. अशी चिठ्ठी मतपेटीत सापडली आहे.

पत्रामधून संचालकांना देखील कानपिचक्या

पुढार्‍यांनो सत्ता येथे आणि जाते, मात्र लोकांना त्रास देऊ नका. तुम्ही काय कायम टिकणार नाही. दुसऱ्याला त्रास दिला की, पुढचे दिवस वाईट येतात, अशा पद्धतीची चिठ्ठी देखील मतांच्या मतपेटीमध्ये आढळून आली आहे.

दुसरीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या रणांगणात विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी चौथ्यांदा बाजी मारली आहे. सत्ताधारी नरके गटाने सर्व 23 जागांवर विजय मिळवत हुकूमत राखली. 15 वर्षांच्या सलग सत्तेनंतर नरके यांना सभासदांनी पुन्हा पाच वर्षांसाठी संधी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलने सर्वच्या सर्व 23 जागांवर विजय मिळवला.

कुंभी कारखान्यासाठी विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व केले. विरोधी राजश्री शाहू कुंभी बचाव पॅनलचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके यांचे चुलते अरुण नरके, गोकुळचे संचालक बाबासाहेब खाडे व चेतन नरके यांनी नेतृत्व केले. या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भोगावती कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील विरुद्ध माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात करवीरमध्ये विधानसभेसाठी सामना निश्चित आहे. त्यामुळे या निकालाने चंद्रदीप नरके यांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget