एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात शिवसेना ठाकरे-शिंदे गटातील वाद गणेश मूर्तीपर्यंत पोहचला; पक्ष, चिन्हानंतर आता एकाच मंडळावर दावा!

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळामध्येही पक्षातील वादामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यावरून वाद निर्माण झाला

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष आणि चिन्हांवरून गेल्या दीड वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन लढा सुरु असतानाच आता चक्क एका गणपती मंडळापर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे. कोल्हापूर शहरामध्ये शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळामध्येही पक्षातील वादामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत ज्यांनी मंडळ स्थापन केलं आहे त्यांनी मुर्तीची प्रतिष्ठापना करावी, आणि राजकीय गटांनी दूर राहावे, असा तोडगा काढण्यात आला होता. मात्र, रात्रीत त्याठिकाणी शिंदे गटाकडून 21 फुटी मूर्ती बसवण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. 

शिंदे गटाने मूर्ती बसवल्याने वाद 

दोन्ही गट आमनेसामने आल्याने याठिकाणी आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला. शिंदे गटाने बैठकीनंतरही 21 फुट मुर्ती बसवल्याने वादाला तोंड फुटले. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे गटाकडूनही क्रियेला प्रतिक्रिया म्हणून त्याच मंडपात 21 फुटी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला.  त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट

छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळामध्ये शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळात ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मंडळाची मूर्तीची प्रतिष्ठापना कोण करणार? यावरुन वाद निर्माण झाला होता. म्हणूनच या ठिकाणी स्थापन केलेल्यांनी गणेशोत्सव साजरा करावा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये असे पोलिस प्रशासन व झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाने मूर्ती बसवल्याने वादाची ठिणगी पडली. हा सर्व प्रकार सुरू असताना त्याठिकाणी शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर पोहोचले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Embed widget