एक्स्प्लोर

Prithviraj Chavan on BRS:  बीआरएस पार्टी भाजपची बी टीम, सर्व रसद भाजपकडून; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

Prithviraj Chavan on BRS: काँग्रेसकडून 24 टीम महाराष्ट्रात पाठवण्यात आल्या आहेत आणि त्या माध्यमातून 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

कोल्हापूरतेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आटापिटा सुरु असतानाचा काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. बीआरएस ही भाजपची बी टीम असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. ते दोन दिवस जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बीआरएस भाजपची बी टीम आहे. त्यांना सर्व रसद भाजपकडून पुरवली जात आहे. चव्हाण यांनी काँग्रेसच्या तयारीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेसकडून 24 टीम महाराष्ट्र राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. आता केवळ आम्ही मित्रपक्ष, विरोधात कोण आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा घेत असल्याचे चव्हाण म्हणाले. 

राजू शेट्टी हे कधीही भाजप सोबत जाणार नाहीत

एकला चलो रे म्हणून भूमिका घेतलेल्या राजू शेट्टी यांच्यावरही त्यांनी भाष्य केले. राजू शेट्टी हे कधीही भाजप सोबत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजू शेट्टी यांनी जातीवादी पक्षांना विरोध केला असल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार 

चव्हाण म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीची ताकद वाढत आहे. कर्नाटक पॅटर्न काँग्रेसने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदारसंघात काय भावना आहेत हे मी पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष फुटला असला तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनं आहे, नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान, आज पहिल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. रविवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील करवीर, चंदगड, कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, तालुकाध्यक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. रविवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ayush Komkar : दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांकडून आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्यावर गोळीबार, पुण्यात श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये नेमकं काय घडलं?
आयुष कोमकर गाडी पार्क करायला गेला, हल्लेखोर धावत गेले अन् गोळ्या झाडल्या, पुणे गँगवॉरनं हादरलं
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Pune Crime : वर्षभरापूर्वी नाना पेठेत रस्त्याच्या पलीकडे वनराज आंदेकरला संपवलेलं, आज आयुष कोमकरला संपवलं, पुण्यात सूडनाट्य
वनराज आंदेकरच्या मारेकऱ्यांमध्ये गणेश कोमकर अटकेत, आज 19 वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या, पुणे हादरलं...
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayush Komkar : दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांकडून आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्यावर गोळीबार, पुण्यात श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये नेमकं काय घडलं?
आयुष कोमकर गाडी पार्क करायला गेला, हल्लेखोर धावत गेले अन् गोळ्या झाडल्या, पुणे गँगवॉरनं हादरलं
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
Pune Crime : वर्षभरापूर्वी नाना पेठेत रस्त्याच्या पलीकडे वनराज आंदेकरला संपवलेलं, आज आयुष कोमकरला संपवलं, पुण्यात सूडनाट्य
वनराज आंदेकरच्या मारेकऱ्यांमध्ये गणेश कोमकर अटकेत, आज 19 वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या, पुणे हादरलं...
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
Pune Crime : वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला, गोविंदा कोमकरचा तीन गोळ्या झाडत खून, गँगवॉरमध्ये मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येनं, पुणे हादरलं
आंदेकर-कोमकर टोळीत गृहयुद्ध, मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येनं, पुणे हादरलं
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती, सदानंद मोरेंचा समावेश, नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार
अभिनेते आषिश वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या
अभिनेते आशिष वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या
Embed widget