एक्स्प्लोर

Kolhapur News : 'प्रेम करताना जात धर्म बघू नका', स्टेटस ठेवत कोल्हापुरात अल्पवयीन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Kolhapur News : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन जीवन संपवलं.

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या प्रेमीयुगुलाने (Couple) गळफास घेऊन जीवन संपवलं. "ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करु नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका," अशा प्रकारचं स्टेटस ठेवत दोघांनीही आयुष्याची अखेर केली. या घटनेत आत्महत्या केलेला तरुण मुस्लीम (Muslim) तर युवती हिंदू (Hindu) आहे. आत्महत्या केलेला तरुण 18 वर्षांचा तर युवतीचं वय 16 वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कुटुंबियांकडून दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध

हे दोघेही अल्पवयीन तरुण आणि तरुणी एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते पण दोन्ही समाज वेगळे असल्याने या प्रेमसंबंधांना घरच्यांकडून विरोध होता. अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती. मात्र आपल्या प्रेमाला विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी (01 ऑगस्ट) रात्री मुलगी बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले असून नातेवाईकांची रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने चंदगडमधील तरुणाची आत्महत्या

एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात घडली होती. विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) असं त्या तरुणाचं नाव होतं. ही घटना 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.  विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केलं होतं. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. "त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतलं. तिला मी विसरु शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी," असं त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं.  

हेही वाचा

मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला अन् तासाभरात त्याने लोहमार्ग गाठलं, देहूरोडमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget