Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील खाकी आणि पांढरपेशातील लाचखोरीचे दिवसागणिक सुरुच आहे. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता राजेंद्र हुजरे यांना प्लंबरकडून दोन कनेक्शन मंजूर करण्याच्या बदल्यात 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कनिष्ठ अभियंता राजेंद्र हुजरे यांच्याविरोधात पालिकेच्या मान्यताप्राप्त प्लंबरने कनेक्शन मंजूर करण्यासाठी लाच मागितल्यानंतर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचून राजेंद्र हुजरे यांना रंगेहाथ पकडले. तक्रारदार प्लंबरने दोन नवीन नळ पाणी कनेक्शन जोडणी प्रकरण मंजुरीसाठी पाणीपुरवठा विभागाकडे सादर केले होते. त्यानंतर राजेंद हुजरे यांनी मंजुरीच्या बदल्यात 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याविरोधात प्लंबरने 19 जुलै रोजी लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता राजेंद्र हुजरे यांनी नविन नळ पाणी कनेक्शन जोडणी प्रकरण मंजुरीसाठी 10 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शिवाजी मार्केट येथील कार्यालयात सापळा लावला असता राजेंद्र हुजरे यांनी तक्रारदार प्लंबरला गंगावेश परिसरातील केदारलिंग बेकरीजवळ येण्यास सांगितले. त्या ठिकाणी सापळा लावला असता 10 हजारांची लाच घेताना राजेंद्र हुजरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर कारवाई राजेश बनसोडे पोलिस उपायुक्त / पोलिस अधीक्षक, लाच लूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, सुरज गुरव, अपर पोलिस उपायुक्त / अपर पोलिस अधीक्षक, लाच लूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आदिनाथ बुधवंत पोलिस उपअधीक्षक, लाच लूचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर, नितीन कुंभार पोलिस निरीक्षक, श्रेणी पोलिस उप निरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पोरे, पोकाॅ रुपेश माने व पोकाॅ संदीप पडवळ लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Crime : कोल्हापूरच्या अवघ्या दहावी पास रियाजने आमदारांना मंत्रिपदासाठी 100 कोटींचा चुना लावण्याचा बेत रचला!
- Hasan Mushrif : वेळ आल्यास लोकसभेला शड्डू ठोकणार का? विचारताच हसन मुश्रीफ काय म्हणाले?
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा
- Sanjay Mandlik : बंटी पाटलांच्या ताकदीने विजयी गुलाल उधळला अन् आता शिंदे गटात, जाणून घ्या खासदार संजय मंडलिकांची राजकीय कारकिर्द
- Sanjay Pawar : कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर