Kolhapur Nagarpalika OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्यानंतर कोल्हापूर मनपासह जिल्ह्यातील 8 नगरपालिकांमधील आता चित्र पालटणार आहे. निवडणुकीच्या रांगेत असलेल्या 8 नगरपालिकांमध्ये 44 जागा इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव राहतील, अशी शक्यता आहे. मात्र, अंतिम संख्या निश्चित झाल्यानंतर या आठही नगरपालिकांतील नेमके चित्र स्पष्ट होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा, पेठवडगाव, मलकापूर, कुरुंदवाड आणि मुरगूड या आठ नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या 8 नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 44 जागा ओबीसी उमेदवारांना मिळणार आहेत. त्यापैकी 24 जागा ओबीसी महिलांना असण्याची शक्यता आहे. निश्चित करण्यासाठी केलेल्या सुत्रानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी आरक्षणा टक्केवारी निश्चित होणार आहे. त्यानुसार ओबीसी जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.
जयसिंगपूर नगरपालिकेत सर्वाधिक 7 जागा राखीव राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर गडहिंग्लज आणि कागल नगरपालिकांत प्रत्येकी 6 जागा ओबीसी राखीव राहण्याची शक्यता आहे, तर पन्हाळा, पेठवडगाव, मलकापूर, कुरुंदवाड आणि मुरगूड या 5 नगरपालिकांत प्रत्येकी 5 जागा ओबीसींना राहतील. या पाचही नगरपालिकांमध्ये प्रत्येकी 3 जागा महिलांसाठी राखीव होण्याचा अंदाज आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif : वेळ आल्यास लोकसभेला शड्डू ठोकणार का? विचारताच हसन मुश्रीफ काय म्हणाले?
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा
- Sanjay Mandlik : बंटी पाटलांच्या ताकदीने विजयी गुलाल उधळला अन् आता शिंदे गटात, जाणून घ्या खासदार संजय मंडलिकांची राजकीय कारकिर्द
- Sanjay Pawar : कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर