एक्स्प्लोर

Madhuri Elephant : माधुरी लवकरात लवकर कोल्हापूरला परतणार, वनताराच्या CEO चा नांदणीच्या मठावर शब्द!

Kolhapur Madhuri News : माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार वनताराकडून करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

Nandani Math Mahadevi Elephant : कोल्हापूरवासियांच्या भावना दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, नांदणी मठाची माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिला. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक मदत पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचंही वनताराच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करू असंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्यात आलं आहे. मात्र स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हत्तीणीला परत पाठवण्याबद्दल वनतारानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या संबंधी नांदणी मठाधिपती आणि वनताराच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.

माधुरीसाठी सर्व व्यवस्था नांदणी मठात करणार

माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत पाठवण्यासंबंधी सर्व ती प्रक्रिया करणार, त्यासाठी अत्यावश्यक सर्व पत्रव्यवहार करणार असल्याचं वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सांगितलं. वनतारा, सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी सर्व त्या सुविधा निर्माण करण्यात येतील आणि नंतर माधुरीला परत पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरवासियांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता

वनताराचे सीईओ म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आलं. कोल्हापूरकरांच्या माधुरीला वनतारामध्ये सर्वात चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण माधुरीसंबंधी कोल्हापूरकराच्या भावना आमच्या लक्षात आल्या. कोल्हापूरकरांच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. यामध्ये कुणाचा विजय किंवा पराजय नाही. हा हत्तीचा विजय आहे. वनतारामध्ये तिला चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि नांदणी मठामध्येही तिला सर्वात चांगल्या सुविधा मिळतील. त्यामुळे या सर्वामध्ये माधुरीचा विजय आहे."

माधुरीसाठी नांदणी मठामध्ये पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत करणार असल्याचं सीईओंनी सांगितलं. माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परत येणार असा शब्दही त्यांनी दिला.

नांदणी मठामध्ये असलेल्या माधुरी हत्तीणीला जखमा झाल्या आहेत, तिच्या हक्कांचं उल्लंघन केलं जातं अशा आशयाची एक याचिका पेटा या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 

न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोल्हापूरवासियांनी नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व भावना लक्षात घेता वनताराच्या अधिकाऱ्यांनी माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
Gokul Election: हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget