एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत उतारा, लिंबू, मिरच्या अन् काळ्या बावल्या सुद्धा जोरात; आज प्रचाराचा सुपर संडे

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यामुळे गावगाड्यावर ऊसतोडीसह प्रराचाला सुद्धा रंगत वाढत चालली आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यामुळे गावगाड्यावर ऊसतोडीसह प्रराचाला सुद्धा रंगत वाढत चालली आहे. आज मतदानापूर्वी अखेरचा रविवार असल्याने उमेदवारांकडून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच ताकद लावली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून सर्वाधिक पन्हाळा तालुक्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीत लिंबू, मिरच्या अन् काळ्या बावल्या सुद्धा जोरात

दरम्यान, प्रचार एका बाजूने शिगेला पोहोचला असतानाच प्रतिस्पर्धी अंधश्रद्धेच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी सुद्धा चांगलेच प्रयत्न सुरु आहेत. गावगाड्यावर उतारा टाकण्यावर अजूनही विश्वास ठेवला जातो, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दारात, लिंबू, मिरच्या, काळ्या बावल्या गुलाल लावलेल्या दिसून येत आहेत. यातून काय साध्य होणार हा संशोधनाचा मुद्दा असला, तरी ज्यांच्या मनात अनामिक भीती यांना अधिकच भीतीच्या छायेत सोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  

भावनेच्या राजकारणाला जोर 

ग्रामपंचायतीचे राजकारण हे पूर्णत: स्थानिक मुद्यांवर आणि भावनिक होत असते. त्यामुळे परडीवर हात मारायला लावणे, शपथ घालणे, रानाला बांध लागून असेल, तर त्याची भीती घालणे, सेवा संस्था असेल, तर त्याची भीती घालणे, दूध संस्था असल्यास त्याची भीती घालणे, असे प्रकारही सर्रास घडून येतात. त्यामुळे  एक भावनेचा बाजार सर्वाधिक मांडला जातो.

Kolhapur District Gram Panchayat Election : चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक जोर  

दुसरीकडे, करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे बिनविरोध झालेल्या 43 ग्रामपंचयती वगळल्यास 431 ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी 1193 उमेदवार रिंगणात आहेत, तर एकूण 1650 प्रभागांमध्ये 8995 सदस्यपदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. 

दुरंगीपासून पंचरंगीपर्यंत लढत

दरम्यान, अनेक गावांमध्ये दुरंगी लढतीपासून पंचरंगी लढती सुद्धा होत आहेत. करवीर तालुक्यातील म्हाळूंगेत महिलांनी प्रकाश चौगले यांनीच अर्ज भरावा यासाठी मोर्चा काढला होता. त्या गावात दुरंगी लढत होत आहे. कागल कट्टर विरोधी असलेल्या मुश्रीफ आणि घाटगे गटातील काही कार्यकर्ते काही ग्रामपंचयतींच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे चित्र आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident वास्तव भाग 33 : भंगार व्यवसायिक ते ब्रम्हा बिल्डर..अगरवाल कुटुंबाचा थक्क करणारा प्रवासKolhapur : कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांचा धुमाकूळ, राजेंद्र नगर परिसरात वाहनांची तोडफोडBhagwan Pawar : मंत्र्याने दबाव आणल होता, निलंबीतअधिकाऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्रABP Majha Headlines : 05 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Jalgaon News : EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ
EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
Embed widget