एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून गावागावात प्रचाराचा धुरळा; 23 सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध  

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी 23 सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे (Kolhapur District Gram Panchayat Election) चित्र स्पष्ट झाल्याने गावगावात आजपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर जिल्ह्यात अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत. 

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध  

दरम्यान, जिल्ह्यात रणधुमाळी सुरू असलेल्या 474 ग्रामपंचायतींपैकी निवडणुकीत 41 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. टोकाची ईर्ष्या होत असलेल्या थेट सरपंचदाववरही 23 जण बिनविरोध निवडून  आले. तसेच 491 हून अधिक सदस्य बिनविरोध निवडून आले. गावागावांत इर्ष्येचे राजकारण पेटणार असताना ही सकारात्मक बाब दिसून आली.  ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान आणि 20 डिसेंबरला मतमोजणी होईल. 

कोल्हापूर शहराच्या वेशीवरील तसेच जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे गटगट मजबूत होण्यासाठी विद्यमान आमदार तसेच माजी आमदारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. थेट सरपंचपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता अनेक गावांमध्ये बहुरंगी लढती होत आहेत. 

Kolhapur District Gram Panchayat Election : कोणत्या गावांमध्ये बिनविरोध निवडणूक झाली? 

बिनविरोध झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती 

शाहुवाडी (Shahuwadi Tehsil Gram Panchayat)

  • करुंगळे, उदगिरी, कोळगाव, भैरेवाडी, सांबू 

गडहिंग्लज  (Gadhinglaj Tehsil Gram Panchayat)

  • कडलगे, बटकणंगले, कौलगे, कडाल

चंदगड (Chandgad Tehsil Gram Panchayat)

  • लक्कीकटे, सातवणे, नागणवाडी

पन्हाळा (Panhala Tehsil Gram Panchayat)

  • पिंपळे तर्फे सातवे, शाहपूर,  मिठारवाडी, आसगाव, कोतोली पैकी माळवाडी, गोलीवडे, किसरुळ, मानवाड, कोलिक, करंजफेण 

गगनबावडा (Gaganbawda Tehsil Gram Panchayat)

  • अणदूर, मार्गेवाडी, कोदे

आजरा (Ajara Tehsil Gram Panchayat) 

  • लाटगाव, आवंडी, धनगरवाडा, पोळगाव, पारपोली, चाफवडे

भुदरगड (Bhudargad Tehsil Gram Panchayat)

  • अंतुर्ली, करडवाडी, पाल,  कोळवण- पाळेवाडी, अनफ खुर्द

राधानगरी (Radhanagari Tehsil Gram Panchayat)

  • आपटाळ,  पाटपन्हाळा,  पडसाळी, करंजफेण, शेळेवाडी, सोळांकूर, मानबेट, ढेंगेवाडी 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावंTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP MajhaMaharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Embed widget