Kolhapur Crime : ओळखीची व्यक्ती घरी आल्याने विचारणा, बायकोने नवऱ्याच्या डोक्यात सळी घातली; कोल्हापुरातील प्रकार
Kolhapur Crime : किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात सळी मारून त्याला जखमी केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) घडली. रंकाळा टॉवर परिसरात ही घटना घडली.
Kolhapur Crime : किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये रागाच्या भरात पत्नीने डोक्यात सळी मारून पतीला जखमी केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) घडली. रंकाळा टॉवर परिसरात ही घटना घडली. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीच्या ओळखीची व्यक्ती संबंधितांच्या घरी आली होती. याबाबत पतीने पत्नीकडे विचारणा केली. विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादात पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी सळीने मारहाण केली. जखमी झालेल्या पतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.
केस मागे घेण्यासाठी केली मारहाण
दरम्यान, शिरोळ तालुक्यातील धरणगुत्तीमध्ये दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी मागे घेण्यासाठी त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली. किरण सिद्धाप्पा शेट्टी, रवी सिद्धाप्पा शेट्टी व पार्वती सिद्धाप्पा शेट्टी (रा. माळभाग, धरणगुत्ती) यांच्या विरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नंदा दयाराम रणदिवे यांनी शिरोळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी रोहिणीच्या पतीने दाखल केलेली केस मागे घे म्हणून किरण शेट्टी व रवी शेट्टी यांनी रोहिणीला शिवीगाळ केली व पार्वती शेट्टीने रोहिणीला मारहाण केली.
चोरीच्या संशयाने मारहाण, एकाचा मृत्यू
दरम्यान, करवीर तालुक्यातील इस्पूर्लीमध्ये दुकानात चोरी करत असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याने अण्णासाहेब आनंदा चौगुले (वय 47) यांचा जखमी होऊन मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्पूर्ली पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे. याप्रकरणी संशयित दिगंबर तुकाराम मगदूम (वय 30 रा. दिंडनेर्ली ता. करवीर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक करण्यात आली आहे.
मृत नानासाहेब आनंदा चौगुले हे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुकानाच्या आवारात फिरताना दिसल्याने दुकान मालक दिगंबर मगदूमने नानासाहेब चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानाच्या आवारात आल्याच्या संशय व्यक्त करत लोखंडी पाईपने मारहाण केल्याने जखमी झाले. ही घटना नानासाहेबांच्या नातेवाईकांना समजतात त्यांनी उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या