एक्स्प्लोर
Kolhapur Crime : कोल्हापुरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावाचा बेदम चोप
हा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेज समोर घडला. लहान मुलांना पळवून नेणारे परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे.

Kolhapur Crime
कोल्हापूर : भरदिवसा मध्यवर्ती गजबजलेल्या कोल्हापुरातील शाहूपुरी भागात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या झटापटीत एक संशयित फरार होण्यात यशस्वी झाला. हा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेज समोर घडला. लहान मुलांना पळवून नेणारे परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा























