एक्स्प्लोर

Kolhapur : कोल्हापुरातल्या डुक्करवाडी गावाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव, पण चुकून 'या' तालुक्याचंच नाव बदललं

Kolhapur Name Change Issue : डुक्करवाडी गावाच्या नावाच्या बदलाचा प्रस्ताव होता, पण नॅशनल इम्फॉरमॅटिक सेंटर म्हणजे एनआयसीने (NIC) तालुक्याचंच नाव बदलून पाठवलं. 

कोल्हापूर: नावात काय आहे? असं शेक्सस्पिअरने जरी म्हटलं असलं तरी आपल्याकडे नावामध्येच सगळं काही आहे याची प्रचीती सातत्याने येते. म्हणून नावामध्ये बदलाचं वारंच आपल्याकडे अधून मधून येतं. त्यामुळेच मग शहराचं नाव बदला, गावाचं नाव बदलण्याची भूमिका घेतली जाते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचं नाव बदलण्याचा एक अजब प्रकार घडला आहे. खरं तर प्रस्ताव चंदगड तालुक्यातील एका गावाचं नाव बदलण्याचा होता. पण त्या गावाचं नाव बदलण्याऐवजी थेट चंदगड तालुक्याचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळं भलताच घोळ होऊन बसला होता. एनआयसीच्या या एका चुकीमुळे चंदगड तालुक्यातील लोकांना मात्र चांगलाच फटका बसल्याचं दिसून आलंय. 

Chandgad Taluka To Rampur : गावाचा नाव बदल प्रस्ताव, तालुक्याचंच नाव बदललं

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला चंदगड तालुका आहे. या तालुक्यामध्ये डुक्करवाडी नावाचं गाव आहे. त्या डुक्करवाडी गावाचं नाव रामपूर असं बदलण्याचा प्रस्ताव नॅशनल इम्फॉरमॅटिक सेंटर म्हणजे एनआयसीकडे (NIC) पाठवण्यात आला होता. पण एनआयसीकडून गावाचं नाव बदलण्याऐवजी थेट चंदगड तालुक्याचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळं ऑनलाईन कागदपत्रांवर आता चंदगड ऐवजी रामपूर तालुका असं नाव येत आहे.

Kolhapur Name Change Issue : प्रशासनाची कामं ठप्प 

या प्रकारामुळं चंदगड तालुक्यातील नागरिक संभ्रमामध्ये पडले आहेत. चंदगड तालुक्याचं नाव बदललं जाण्याचं हे प्रकरण खूप गंभीर आहे. कारण ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्रं काढत असलेल्या नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचं दिसून येतंय. कोल्हापुरात रामपूर तालुका अस्तित्वातच नसल्यानं नागरिकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ नावाच्या बदलामुळं सर्व कामकाज ठप्प झालं आहे. 

डुक्करवाडी (Dukkarwadi Village) या गावाच्या नावात बदल करावा अशी मागणी या गावातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यानंतर या गावाचं कागदोपत्री नाव बदलून रामपूर असं करण्यात यावं यासाठी एनायसीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. पण एनआयसीने गावाचं नाव न बदलता थेट तालुक्याचंच नाव बदललं आणि घोळ झाला. 

सर् ऑनलाईन कागदपत्रांवर तालुका रामपूर आणि जिल्हा कोल्हापूर असं नाव येत आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झालं आहे. ज्या नागरिकांना ऑनलाईन कागदपत्रं हवी आहेत त्यांनी ती लगेच घेऊ नयेत, कारण त्यामुळे अडचण येऊ शकते. ही चूक दुरुस्त झाल्यानंतर  कागदपत्रं घ्यावीत असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget