एक्स्प्लोर

Bhaurao Patil: ऐतिहासिक गावातील शाळेच्या यादीतून भाऊराव पाटलांची शाळा वगळली, सरकारचं दुर्लक्ष की कर्मवीरांना महापुरूष मानत नाही?

Karmaveer Bhaurao Patil School : कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब मुलांच्या शिक्षणाची दारं खुली केली.

Karmaveer Bhaurao Patil School : राज्यातील 13 महापुरूषांच्या गावातील शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने 14 कोटी 30 लाखांचा निधी जाहीर केला आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या नावांचा समावेश आहे. पण राज्यात शिक्षणाची पाळंमुळं ज्या व्यक्तीने रुजवली, ज्या व्यक्तीने गरीबांच्या शिक्षणाची दारं खुलं केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावातील शाळेचा मात्र राज्य सरकारला विसर पडल्याचं चित्र आहे. कर्मवीरांनी ज्या शाळेतून शिक्षणाचे धडे गिरवले त्या कोल्हापुरातील कुंभोज (Kolhapur Kumbhoj School) या गावातील कुमार विद्या मंदिराचा विकास करण्याकडे मात्र राज्य सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट झालंय. 

महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातंय. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरूजी यांच्यासह अनेक महापुरुषांची यादी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचे नाव समाविष्ट केल्याशिवाय मात्र ती पूर्ण होणार नाही हे नक्की.

कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या त्यांच्या आजोळी गावी झाला. याच कुंभोज गावातील ब्रिटिशकालीन शाळा असलेल्या कुमार विद्या मंदिर या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्या गावातील शाळेतील रजिस्टरमध्ये याची नोंद मोडीलिपीमध्ये आहे. कोल्हापुरातील मोडीलिपी तज्ज्ञ वसंत सिंघन यांनी सांगितलं की शाळेतील नावांच्या यादीत वरुन दुसऱ्या क्रमांकावर भाऊ पायगोंडा पाटील ऐतवडेकर असं त्यांच्या नावाची नोंद आहे.  

Bhaurao Patil: ऐतिहासिक गावातील शाळेच्या यादीतून भाऊराव पाटलांची शाळा वगळली, सरकारचं दुर्लक्ष की कर्मवीरांना महापुरूष मानत नाही?

भाऊराव पाटलांची या शाळेत घातल्याची तारीख ही 9 जून 1898 अशी आहे. तर त्यांनी दुसरीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ही शाळा सोडली. त्यांचे शाळेतून नाव काढल्याची तारीख ही 9 जानेवारी 1899 अशी आहे. त्यानंतर भाऊराव पाटील यांनी दहिवडे, विटे या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. सन 1902 ते 1909 या कालावधीत भाऊराव पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होते. शाहू महाराजांनी सुरू केलेल्या जैन बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी राजाराम हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. 

Bhaurao Patil: ऐतिहासिक गावातील शाळेच्या यादीतून भाऊराव पाटलांची शाळा वगळली, सरकारचं दुर्लक्ष की कर्मवीरांना महापुरूष मानत नाही?

कर्मवीर आण्णांचं  साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं आणि त्याचं आता वटवृक्षात रुपांतर झालं. कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य गरीब मुलांना शिक्षणाची दारं खुली केली. आज त्यांच्या विचारावर चालणाऱ्या अनेक शाळा आणि शिक्षणसंस्था आहेत. आज महाराष्ट्राचं जे पुरोगामी रूप दिसतंय त्यामध्ये इतर महापुरुषांप्रमाणे कर्मवीर आण्णांचं मोठं योगदान आहे. 

अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, अंधश्रद्धा, सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरोधात भाऊराव पाटलांनी बंड पुकारला. त्यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती निर्माण केली. अशा कर्मविरांनी ज्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलं त्या शाळेचा आज राज्यशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विसर पडल्याचं दिसतंय. आज या शाळेला खऱ्या अर्थाने मदतीची गरज असताना सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महापुरूषांच्या शाळांच्या विकासाची जी योजना राज्य सरकार राबवतेय त्या यादीमध्ये कुंभोजच्या शाळेचं नाव समाविष्ट करावं अशी मागणी गावकऱ्यांची आहे. 

या 13 शाळांचा विकास करण्यात येणार 

1. राजर्षी शाहू महाराज जिल्हा परिषद शाळा हिंदुराव घाडगे विद्यामंदिर, कागल (1 कोटी 11 लाख 86 हजार)
2. महात्मा फुले - ज्योती सावित्री इंटरनॅशनल, जिल्हा परिषद शाळा खानवडी जि. पुणे (1 कोटी 46 लाख 62 हजार)
3. सावित्रीबाई फुले - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक विद्यालय नायगाव जि. सातारा (1 कोटी 54 लाख 3 हजार)
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रतापसिंह हायस्कूल, सातारा (1 कोटी 25 लाख 87 हजार)
5. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा क्र. 1 वाटेगाव जि. सांगली (1 कोटी 3 हजार)
6. क्रांतिसिंह नाना पाटील नगर - जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, येडे मच्छिंद्र जि. सांगली (54 लाख 42 हजार)
7. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज -जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक (1 कोटी 85 लाख 28 हजार)
8. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चौंडी जि. अहमदनगर (2 कोटी 3 लाख 43 हजार)
9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जिल्हा परिषद शाळा, मोझरी जि. अमरावती (55 लाख 68 हजार)
10. संत गाडगेबाबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव जि. अमरावती (49 लाख 68 हजार)
11. शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख - जि. प. प्राथमिक शाळा पापळ जि. अमरावती (1 कोटी 72 लाख 8 हजार)
12. महर्षी धोंडो केशव कर्वे जि. प. प्राथमिक शाळा मुरूड जि. रत्नागिरी (37 लाख 35 हजार)
13. साने गुरुजी जि. प. प्राथमिक शाळा पालगड जि. रत्नागिरी (3 कोटी 38 लाख 32 हजार)

ही बातमी वाचा :

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget