Kolhapur District Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना 19 जानेवारीपर्यंत निवडणूक खर्च सादर करण्याचे निर्देश
कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. ही निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याची मुदत 30 दिवसांची आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 474 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. ही निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याची मुदत 30 दिवसांची आहे. जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीकरीता निवडणूक लढविलेल्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी 19 जानेवारी 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन महसूल विभागाचे प्रभारी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रितीने निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यात जे ग्रामपंचायत उमेदवार कसूर करतील त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये पुढील पाच वर्षासाठी अपात्र करण्याची तरतूद आहे. सर्व ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर करावा, असेही आवाहन कांबळे यांनी केले आहे.
“पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषी सहाय्यक त्या-त्या गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करणार आहेत. तसेच तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करुन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे.
जीडीसी ॲण्ड ए परीक्षेसाठी 5 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
दरम्यान सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी. ॲण्ड ए परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा 2023 ची परीक्षा 26 ते 28 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जी.डी.सी. ॲण्ड ए परीक्षा केंद्र प्रमुख तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या