Kolhapur Police : कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा मद्यप्राशन करून हॉटेलमध्ये धिंगाणा, पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगली
Kolhapur Police : या फुकट्या पोलिसाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाल्याने बिंग फुटले. तानाजी विचारे असे त्याचे नाव असून तो पोलिस स्टेशनमध्येही दारुच्या नशेत वावरत होता.

भुदरगड (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर पोलिस दलातील भुदरगड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने दारु ढोसून हाॅटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. या फुकट्या पोलिसाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाल्याने बिंग फुटले. तानाजी विचारे असे त्याचे नाव असून तो पोलिस स्टेशनमध्येही दारुच्या नशेत वावरत होता. त्यामुळे त्याची भागातील अरेरावी चर्चेचा विषय झाला होता.
तानाजी विचारेनं हॉटेलमध्ये बिल देण्यास नकार देत भरदिवसा हॉटेल चालकाला मारहाण केल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली. विचारेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यामुळे कोल्हापूर पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. भुदरगड तालुक्यातील पिंपळगांव परिसरातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. तानाजी विचारेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दारुड्या पोलिसाची दररोजी मुजोरी
गारगोटी गडहिंग्लज मार्गावर तानाजी विचारेची ये जा असल्याने बुधवारी दुपारी हाॅटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. प्रत्येकवेळी तो मुजोरी करत होता. मात्र, पोलिस असल्याने दुर्लक्ष केले जात होते. बुधवारी दुपारी सुद्धा दारुच्या नशेत त्याने पुन्हा मुजोरी केली. सर्व्हिस चांगली दिली नसल्याचे त्याने पैसे देण्यास नकार दिला. पैशाची विचारणा करताच त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























