एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hasan Mushif on Gokul : राज्यातील बंद पडलेले दूध संघ गोकुळने घेऊन ते चालवले पाहिजेत; आमदार हसन मुश्रीफ यांनी मांडली भूमिका

राज्यातील बंद पडलेले दूध संघ गोकुळने घेऊन ते चालवले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण विधान आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. गोकुळ फ्लेवर मिल्क (सुंगधित दूध) शुभारंभ प्रसंगी मुश्रीफ यांनी भूमिका मांडली.

Hasan Mushif on Gokul : राज्यातील बंद पडलेले दूध संघ गोकुळने घेऊन ते चालवले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण विधान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushif on Gokul) यांनी केलं आहे. गोकुळकडून उत्पादित करण्यात आलेल्या गोकुळ फ्लेवर मिल्क (सुंगधित दूध) शुभारंभ प्रसंगी बोलताना मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. गोकुळने सुगंधीत दूध हे स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध केलं आहे. येत्या काळात मसाला ताक, मॅगो लस्सी व व्हेनिला लस्सी टेट्रापॅकमध्ये पॅकिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. 

हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोकुळने आता सुगंधी दुधात प्रवेश केला आहे. गेल्या काही काळांपासून ग्राहकांकडून सुगंधीत दुधाची (फ्लेवर मिल्क) वारंवार मागणी केली जात होती. ती मागणी लक्षात घेऊन गोकुळच्या संचालक मंडळाने 200 मिली बॉटलमध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. फ्लेवर दूध हे गोकुळच्या उच्च दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून तयार केलं आहे. हे दूध डबल टोन्ड दुधापासून तयार केलेले असून त्यावर उच्च दर्जाची प्रकिया केल्याने सामान्य तापमानाला 180 दिवस टिकणारे आहे. त्यामुळे गायीच्या दूधाचा वापरही वाढणार आहे, सुगंधीत दूध तयार करतांना वापरलेले कलर व फ्लेवर हे उच्च दर्जाचे व फुडग्रेड क्वॉलीटीचे असल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा मला विश्वास आहे. 

गोकुळकडून सध्या फुल क्रिम व गाय दुधाची विक्री कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्याबरोबरच पणजी (गोवा), पुणे व मुंबई ठाणे जिल्ह्यात केली जात आहे. सध्या दररोज सरासरी 14 लाख 50 हजार लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जात आहे. दुधाबरोबरच गोकुळच्या दही, ताक, पनीर, लस्सी, टेबल बटर, श्रीखंड, फ्रुटखंड, आम्रखंड, बासुंदी, टेट्रापॅक मधील दूध व तूप इत्यादी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

कोल्हापुरात जानेवारीत इंडियन डेअरी फेस्टिव्हल

काही वर्षांपूर्वी मेगा मिल्क डेअरी इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रथमच ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ (Indian Dairy Festival In Kolhapur) आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव 20 जानेवारीपासून तीन दिवस चालणार आहे. यात खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि विविध डेअरी उत्पादने, यंत्रसामग्री आणि व्यवसाय योजनांचे प्रदर्शन पाहायला मिळेल. इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून कोल्हापुरात 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे (Indian Dairy Festival In Kolhapur) आयोजन करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
Embed widget