Sambhajiraje on Vishalgad Fort : महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढणार; जिल्हाधिकाऱ्यांचे संभाजीराजेंना आश्वासन
महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाईल, असे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje on Vishalgad Fort) यांना दिले आहे.

Sambhajiraje on Vishalgad Fort : महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाईल, असे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje on Vishalgad Fort) यांना दिले आहे. जातीय तेढ किंवा हिंदू-मुस्लिम हा विषय नसून या किल्ल्यावरील अतिक्रमणाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला. जे मूळ लोकं आहेत, त्यांना राहू द्या, असेही सांगितल्याचे ते म्हणाले.
संभाजीराजे यांनी विशाळगडच्या रहिवाशांसोबत बैठक घेतली. या बैठकीत दर्ग्याबद्दल सवित्तर चर्चा झाली. किल्ल्यावर अतिक्रमण झाल्याचे सगळ्यांनी मान्य केल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, विशाळगड (Sambhajiraje on Vishalgad Fort) हा शिवाजी महाराज यांना आश्रय देणारा किल्ला आहे. या विशाळगड किल्ल्यावर महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विशाळगड मोकळा श्वास कधी घेणार हा खरा प्रश्न आहे.
ते पुढे म्हणाले, अनेक अवैध गोष्टी विशाळगडावर होत आहेत. किल्ल्यावर गचाळपणा काळात वाढला आहे. अतिक्रमणे हटवताना कुणाचा दबाव खपवून घेऊ नका हे सांगितलं आहे. हा दर्गा शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. मात्र, त्यानंतर जे काही बांधलं आहे, जे अतिक्रमण केलं आहे ते काढलं पाहिजे. अतिक्रमण करण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. 5 कोटी निधी दिला, पण त्याचं काय केलं? असा प्रश्न मी अधिकाऱ्यांना विचारल्याचे त्यांनी सांगितले.
तर मला देखील कर्नाटकात जावं लागेल
संभाजीराजे यांनी (Sambhajiraje on Karnataka) कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीवरून भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही आजही म्हणतो कर्नाटकची माणसं आपली आहेत. मात्र, आणि इथं येऊन बोम्मई काहीही वक्तव्य करत आहेत. वेळ पडली, तर मला देखील कर्नाटकात जावं लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
