एक्स्प्लोर

Kolhapur News : खादी व ग्रामोद्योग जागेवरून वाद, भारती पवारांच्या आरोपांवर अमल महाडिक काय म्हणाले? 

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाची सुमारे 200 कोटींची मालमत्ता 15 कोटींमध्ये खरेदी करत असल्याच्या आरोपानंतर माजी आमदार अमल महाडिक यांनी खुलासा केला आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाची सुमारे 200 कोटींची मालमत्ता 15 कोटींमध्ये खरेदी करत असल्याचा आरोप माजी नगरसेविका भारती पोवार यांनी केला आहे. महाडिकांनी या जागेच्या व्यवहारात  200 कोटींचा ढपला पाडल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. त्यांच्या आरोपानंतर माजी आमदार अमल महाडिक यांनी  खुलासा करताना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

अमल महाडिक यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, कोणत्याही संयुक्तिक माहितीविना व पुराव्याशिवाय प्रसिद्धीपत्रक दिल्याचा दावा माजी आमदार अमल महाडिक यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात मजकूर आमची बदनामी करण्याच्या हेतू असल्याचा आरोप अमल महाडिक यांनी केला. तसेच धर्मादाय आयुक्तांचा अवमान करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माजी नगरसेविका भारती पोवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. 

भ्रष्ट अध्यक्ष आणि संचालक मंडळावर कारवाई करावी

दुसरीकडे शाहूपूरी पोलिस आणि मनपा प्रशासनाकडून कायद्याला हरताळ फासत गुन्हेगारांना मदत होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्ट अध्यक्ष आणि संचालक मंडळावर कारवाई करावी, अशीही मागणी भारती पोवार यांनी केली आहे. 

माजी नगरसेविका भारती पोवार यांनी जागेच्या व्यवहारावरून अनेक गंभीर आरोप महाडिक कुटुंबीयांवर केले आहेत. संस्थेच्या जागेमध्ये चोरी तसेच इतर गुन्ह्यातील मोटारी तोडण्याचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. संघाचे अध्यक्ष सुंदर देसाई यांना हाताशी धरून गांधी विचारांच्या संस्था उद्ध्वस्त केल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

देसाई आणि महाडिकांच्या हस्तकाने वैयक्तिक फायद्यासाठी हळूहळू उद्योग व्यवसाय बंद करून सदरची जागा रिकामी पाडली. मात्र, या जागेचा घटनात्मक  कामांसाठी न करता अवैधरित्या वापर करून लाभ मिळवण्याचे प्रयत्न असल्याचेही भारती पोवार यांनी म्हटले आहे.  

महापालिकेच्या या जागेमध्ये सह हिस्सेदार असताना  मनपा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय चारी बाजूंनी पत्रे उभा करून अवैध बांधकाम केले आहे. तसेच संस्थेच्या जागेत 40 वर्षांपासून राहणाऱ्या मुर्तीकारांवर प्राणघातक हल्ला करून महामानवांच्या मुर्त्यांची तोडफोड केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शाहुकालीन विहिर मुजवल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
Kolhapur Crime News: 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Kolhapur jaggery: केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget