Shivaji University : शिवाजी विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ संपता संपेना, लाॅचा 'आयपीआर' पेपर आता 29 ऑगस्टला
शिवाजी विद्यापीठातील विधी अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स' या विषयाची पुनर्परीक्षा 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज या विषयाची परीक्षा होती.
Shivaji University : शिवाजी विद्यापीठातील विधी अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स' या विषयाची पुनर्परीक्षा 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज या विषयाची परीक्षा होती. मात्र, या पेपर संदर्भात सांगलीमधील एका महाविद्यालयामध्ये गैरप्रकार समोर आल्यानंतर पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठांमध्ये परीक्षांमधील गोंधळ सुरूच असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सात महाविद्यालये येतात. 2021-22 बऱ्याच महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंग विधी आणि इतर अभ्यासक्रमांच्या शाखा उशिरा सुरू झाल्याने त्यांचा अभ्यासक्रम शिकून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विधी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
विधी शाखेच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स विषयाचा पेपर आज 26 ऑगस्टला होणार होता. परंतु, या विषयाची प्रश्नपत्रिका ही खूप कठिण सेट केल्याने तसेच बरेच प्रश्न चुकीचे आणि अभ्यासाबाहेरचे असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले त्यानुसार संबंधित विषयाचा पेपर रद्द करून आता 29 तारखेला होणार आहे. या प्रकारानंतर आता त्याची शहानिशा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून शुक्रवारपर्यंत संबंधित महाविद्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या