एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात शिंदे आणि अजित पवार गटातील संघर्ष कायम; उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमाकडे मुश्रीफांनी फिरवली पाठ!

Kolhapur News : बिद्री कारखान्याच्या निमित्ताने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील असा संघर्ष रंगला आहे.

कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या बिद्री साखर कारखान्यातील (Bidri Sakhar Karkhana) पडसाद आज गारगोटीमधील कोल्हापूर (Kolhapur) उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसून आले. कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाकडे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाठ फिरवल्याने राजकीय भूवया उंचावल्या. त्यामुळे कोल्हापुरात शिंदे आणि अजित पवार गटातील संघर्ष कायम आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या मतदारसंघातील गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन आज (24 डिसेंबर) आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. मात्र, या कार्यक्रमाला मुश्रीफ यांनी पाठ फिरवली. 

बिद्री कारखान्याच्या निमित्ताने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील असा संघर्ष रंगला आहे. अजित पवार गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला साथ दिली होती. त्यांना सोबत घेण्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी भूमिका बजावली होती. मात्र, विरोधी आघाडीचा धुव्वा उडवत मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने के. पी. पाटील यांनी बिद्री कारखान्यात सत्ता राखली आहे. 

राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रिल 

दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सुरु असलेल्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, हा व्हेरियंट सौम्य आहे. केरळमध्ये जे तीन मृत झाले त्यात जेएन 1 नव्हता. काल (23 डिसेंबर) टास्क फोर्सची याबाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत काल माझी बैठक झाली आहे. येत्या काळात गर्दीचे कार्यक्रम आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं आहे.

कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नसल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला. कोल्हापूरमध्ये कोविड काळात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्याची मी पूर्ण माहिती घेतली नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, कोणी दोषी आढळलं, तर कावाई नक्की होणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर तानाजी सावंत यांनी अधिक प्रतिक्रिया देणं टाळले. जरांगे पाटील यांच्या निर्णयाबाबत पक्षाचे वरिष्ठच बोलू शकतील, असे सांगत सावध पवित्रा घेतला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहितीABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget