एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vishalgad Encroachment : विशाळगडावरील परिस्थिती नियंत्रणात, दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार; पोलिसांनी दिली माहिती

माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी, चालेल पण शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका, सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजी राजे यांनी छत्रपती यांनी दिला.

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना सुद्धा झाल्या. विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. दर्ग्यावर सुद्धा हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे शिवभक्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आंदोलन मागे घेतलं. मात्र, जर सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर शिवभक्तांचा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. 

शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका

दरम्यान, विशाळगडावर परिस्थिती नियंत्रण असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र पंडित यांनी काही संशयितांची ओळख पटली असल्याचे सांगितले. दुसरीकडे आक्रमक भूमिक घेतलेल्या संभाजीराजे यांनीही गडावर हजेरी लावली. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी, चालेल पण शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका, सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजी राजे यांनी छत्रपती यांनी दिला. उद्यापासून अतिक्रमण काढून घेतलं जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याचे संभाजी राजे छत्रपती म्हणाले. ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या पण तो शिवभक्तांचा आक्रोश होता. जर सरकारने दोन दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवर गुन्हे दाखल करू नका असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय 

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेली आंदोलनाची भूमिका अनाकलनीय आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढावित अन्यथा हिंदुत्ववादी संघटना वक्फ बोर्डाच्या जागांवर मंदिरे बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला होता. विशाळगडावरील वाद दोन धर्मातील नसून तो केवळ अतिक्रमणांचा आहे. दोन्ही धर्मियांची अतिक्रमणे आहेत. सर्वच अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, मेसेज तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करू नयेत, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Leaders Azad Maidan:  महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आझाद मैदानावर केली पाहणीEknath Shinde Health : एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नाही; उपचार सुरूMahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेगCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Embed widget