एक्स्प्लोर

कोल्हापूर काँग्रेसमध्ये अस्वस्थता, अनेक नेते भाजपच्या वाटेवर, खासदार धनंजय महाडिकांचा दावा

Rajya Sabha MP Dhananjay Mahadik : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.  अनेक काँग्रेस आमदार (Congres MLA) आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन करत घेतलेल्या भूमिकेला दिलं समर्थन.

Rajya Sabha MP Dhananjay Mahadik : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. अनेक काँग्रेस आमदार (Congres MLA) आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन करत घेतलेल्या भूमिकेला दिलं समर्थन. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणं अशक्य असल्याचं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadansiv) यांनीही अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचं म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला. आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असल्याचे वक्तव्य केलेय.

कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. धक्कातंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्ह्यातील काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचं वाटू लागलंय. त्यामुळे भाजपकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे, असे महाडिक म्हणाले. 

अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार युतीत येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर सिद्धकी आणि काल काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आलेत. पुढच्या वेळी अनेक लोकं भाजपमध्ये येतील, असे महाडिक म्हणाले. राज्यात भाजपचे वातावरण झाले आहे, त्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये येतील. त्याला कोल्हापुरही अपवाद राहणार नाही, असेही महाडिक म्हणाले. 

अब की बार चारसो के पार

अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. ते सरकार स्थगितीचे, ठप्प आणि भ्रष्टाचार करणारे सरकार होते. कोविडच्या काळात त्यातून पैसे खाण्याचे काम कोल्हापूरसह राज्यातून झाले. त्या काळात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे दाखले आहेत. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवणे या गाव चलो अभियानाचा उद्देश आहे. काहीच केले नसते तर लोकांनी प्रतिसाद दिला नसता. भाजपला देशात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अब की बार चारसो के पार हे व्हिजन घेऊन भाजपा कामाला लागली आहे, असे महाडिक म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget