एक्स्प्लोर

Pravin Darekar on Sanjay Raut : संजय राऊत आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील करायला निघालेत, त्यांचा वैचारिकतेचा ऱ्हास झालाय; प्रवीण दरेकरांची बोचरी टीका 

मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या खणाखणीत आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी संजय राऊत यांचा वैचारिक ऱ्हास झाल्याची बोचरी टीका केली आहे.

Pravin Darekar on Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या खणाखणीत आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी संजय राऊत यांचा वैचारिक ऱ्हास झाल्याची बोचरी टीका (Pravin Darekar on Sanjay Raut )केली आहे. प्रवीण दरेकर यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अशा पद्धतीचा वाद योग्य नाही, ती संस्कृती नाही. नारायण राणे हे सडेतोड बोलतात ती त्यांची स्टाईल आहे, कधी कधी त्याचे समर्थन करता येणार नाही, पण संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळलेला दिसत आहे. 100 टक्के वैफल्यग्रस्त झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. हमरीतुमरीवर येणं म्हणजे राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचं दिसतं आहे. 

सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे

दरेकर यांनी सरकार उत्तम पद्धतीने काम करत असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या क्षमतेने अनेक निर्णय घेतले जातात. दोन वर्षे सोडा पुढचे 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, काही अडचण नाही, असा दावा त्यांनी केला. 

गिरे तो भी टांग उपर 

दरेकर यांनी अजित पवारांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. गिरे तो भी टांग उपर  असं असं अजित पवारांचं झालं असल्याचे दरेकर म्हणाले. विधान चुकल्यानंतर, विरोध झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती, पण अजित पवार यांच्यात इतका अहंकार आहे, की आम्ही सगळ्यांवर आहोत ते त्यांच्यातून जायला तयार नाही.असं विकृत प्रदर्शन कधीच झालं नाही ते अजित पवार आणत आहेत.

संजय राऊत आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील करायला निघालेत

दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतृत्व देण्यावरून संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा खोचक शब्दात समाचार घेतला. संजय राऊत यांनी कारभार द्यायला कशाला पाहिजे, आधीच कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे गेला आहे.  एकनाथ शिंदे देखील केबिनच्या बाहेर असत. त्यांच्या खात्याच्या बैठका आदित्य ठाकरे घेत होते. ठाकरे गटाकडे आता शिवसेना किती राहिली आहे? संजय राऊत आदित्य ठाकरे यांना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत. 

संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सावध भूमिका 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्यावर भाष्य केल्यानंतर दरेकर यांनी सावध भूमिका घेतली. मला माहीत नाही कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याबाबत निर्णय घेत असतात आमदारांच्या पातळीवर हा निर्णय होत नाही, त्यामुळे कुणी हवेत तारखा देऊ नये. 

महत्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
Embed widget