Sanjay Telnade : इचलकरंजीमधील कुख्यात गुंड संजय तेलनाडेला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीर मंजूर झाला आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय तेलनाडे बाहेर येणार आहे. मोक्का अंतर्गत गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मंजूर झाला आहे.  त्याच्या गँगवर 2019 मध्ये मोक्काची कारवाई करण्यात आली होती. त्याला जामीन मंजूर झाल्याची माहिती वकीलांनी दिली होती. 


संजय तेलनाडेवर खून खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, सरकारी नोकरावर हल्ला, लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग, सामूहिक बलात्कार, क्रिकेट बेटिंग, खंडणी यासह मटकाबुकी मालक म्हणून 10 गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याचा भाऊ सुनील तेलनाडे याच्यावरही दरोडा, खून आर्दीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.


जानेवारी 2022 मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे येथून संजय तेलनाडेला अटक केली होती. तेव्हापासून मोक्का  रद्द व्हावा यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने संजय तेलनाडेला जामीन मंजूर केली असल्याची माहिती वकील सचिन माने यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या