Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडझाप होत असली, तरी आज सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून जोरदार पाऊस होत असल्याने नदी तसेच धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. 


हवामान विभागाने पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 41बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 


दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सात टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धरणात आता 57 टक्के पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणामध्ये 124.72 दघलमी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून 1350 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 


खालील बंधारे पाण्याखाली गेले आहेत


शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, वालोली, यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, सवते-सावर्डे, शिरगाव, सरूड-पाटणे, कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, कानर्डे, सावर्डे, पिळणी, बिजूर भोगोली, चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, दत्तवाड, सुळकूड, शेणवडे, कळे व बीड.


इतर महत्वाच्या बातम्या