Sanjay Mandlik : आमदारानंतर आता खासदारही शिवसेनेतून फुटणार अशी सुरू असलेली चर्चा केवळ अफवा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिंरजीव खासदार श्रीकांत शिंदे वगळता सर्व खासदार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे ते म्हणाले.

  


मला शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी कोणीही विचारणा केलेली नाही. मी आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे खासदार धैर्यशील माने हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत आणि कायमपणे राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


ते म्हणाले पुढे म्हणाले की, राज्यात शिवसेनेचे 18 खासदार आहेत. यामधील खासदार श्रीकांत शिंदे तसेच एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व खासदार शिवसेनेसोबत राहतील. शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी दिल्लीमध्ये काही खासदारांची बैठक झाल्याचे सांगितले गेले, पण ज्यांच्या घरी बैठक झाली म्हणाले, त्यांनी अशी  बैठक झाली नसल्याचे सांगितले आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या