(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षात कोंबून निर्जनस्थळी अत्याचार करण्याचा प्रयत्न; अन्य एका घटनेत तरुणीचा विनयभंग
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji Crime) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अत्याचार करण्याचा (Sexual Assault) प्रयत्न झाला.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji Crime) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अत्याचार करण्याचा (Sexual Assault) प्रयत्न झाला. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आईला हा गंभीर प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पाच दिवसांनी ही घटना उघडकीस आली आहे. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर एका नराधमावर गावभाग पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकील हुसेन शेख (वय 45 रा. टाकवडे) असे त्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला त्याने काळ्या-पिवळ्या रंगाच्या तीनचाकी रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर मुलीस जबरदस्तीने बसवून अज्ञातस्थळी घेवून जात रस्त्यावर रिक्षा थांबवली. येथे लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीने पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
Kolhapur Crime : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कारचालकाला बेड्या
दुसरीकडे कोल्हापुरातून (Kolhapur Crime) पुण्याला जाणाऱ्या तरुणीचा खासगी कंपनीच्या कार चालकाने निनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित कारचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कार भाड्याने घेऊन पुण्याला जाताना कारचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा (juna rajwada police station) पोलिसांनी कार चालक रोहित राजेंद्र कार्वेकर (वय 28, रा. दानोळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) याला सोमवारी पोलिसांनी अटक केली.
कोल्हापुरातील तरुणी कामानिमित्त कार भाड्याने घेऊन बाहेरगावी जात असते. पीडित तरुणीने नेहमीप्रमाणे गुरुवारी खासगी कंपनीची कार भाड्याने घेऊन पुण्याला जाताना कारचाल कर्वेकरने तिच्याशी गैरवर्तन केले. संबंधित तरुणीने कोल्हापुरात (Kolhapur Crime) परतल्यानंतर संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर कंपनीच्या मालकाने कारचालकाला कामावरून कमी केले होते. त्यामुळे याचाच राग मनात धरून त्याने पीडित तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. त्यामुळे पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत संबंधित कारचालकालविरोधात गुन्हा दाखल केला.
इतर महत्वाच्या बातम्या