एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation : शनिवारपासून कोल्हापुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा 

Kolhapur : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणाऱ्या भागास पंप दुरूस्त होईंपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

Kolhapur Municipal Corporation : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणाऱ्या भागास पंप दुरूस्त होईंपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व संलग्न उपनगरांना शनिवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ए , बी वॉर्ड व संलग्न उपनगरांना रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पंप दुरूस्त होऊन कार्यान्वित होईपर्यंत एक दिवसाआड 30 जानेवारीपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर (Kolhapur Municipal Corporation) शहराच्या जवळपास ७० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राच्या (Shingnapur pumping station) मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळती शोधण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे गळती शोधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका पुढील आठवड्यात उपसा केंद्र पुन्हा बंद करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील आठवड्यात गळती शोधण्यासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.  

दरम्यान, ई वॉर्डास व संपूर्ण राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडिक वसाहत आदी भागात शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे.  

ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे भाग व शहरातंर्गत येणाऱ्या संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, चंद्रेश्वरगल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय पी पोवार नगर, मिरजकर तिकटी इत्यादी भागामध्ये शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे.  

शहरातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget