Kolhapur Rain : राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला, पंचगंगा नदी आज इशारा पातळीवरून खाली येण्याची शक्यता
Kolhapur Rain : कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरण्याचा पुन्हा एक दरवाजा उघडला गेला आहे.
Kolhapur Rain : कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरण्याचा पुन्हा एक दरवाजा उघडला गेला आहे. आज पहाटे 5 वाजून 48 मिनिटांनी राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला गेला. उघडलेल्य दरवाजामधून 1 हजार 428 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून पाॅवर हाऊसमधून 1 हजार 600 क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणातून एकूण 3 हजार 028 विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट
गेल्या चार दिवसांपासून पावसाने तुरळक अपवाद वगळता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पाणी पातळी आज सकाळी सहा वाजता 39 फुट 2 इंच इतकी होती. त्यामुळेच कदाचित आज पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास इशारा पातळीवरून पंचगंगा नदी खाली येण्याची शक्यता आहे.
पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट आहे तर धोका पातळी 43 फूट आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यामधील बंधाऱ्यांवरील पाणी सुद्धा झपाट्याने खाली होत आहे. जिल्ह्यामधील 56 बंधाऱ्यांवर अजूनही पाणी असून तेही एक दोन दिवसात कमी होण्याची दाट शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Independence Day 2022 : गेल्या 75 वर्षांमध्ये कोल्हापुरातल्या 'या' गावात एसटी पोहोचलीच नाही, शाळेसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच
- शिंदे सरकारकडून खातेवाटप जाहीर, चंद्रकांत पाटलांकडे तीन खात्यांचा कारभार, पण महसूल, सहकार मिळाले नाही!
- Dhairyasheel Mane Rally in Kolhapur : तिरंगा रॅलीतून बंडखोर खासदार धैर्यशील मानेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!
- Kolhapur News : परदेशातून आयात केलेल्या कापडाचा साडे चार लाख किंमतीचा तिरंगा कोल्हापुरात डौलाने फडकणार!