Kolhapur Municipal Corporation : 15 ते 25 डिसेंबर गोवर आणि रुबेला लसीकरण विशेष मोहीम; प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation : मुंबईसह उपनगरांमध्ये गोवर रुणांची संख्या पाहता प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
Kolhapur Municipal Corporation : मुंबईसह उपनगरांमध्ये गोवर रुणांची संख्या पाहता प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कोल्हापूर मनपा (Kolhapur Municipal Corporation) प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना निर्देश दिले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून आज अखेर 23,085 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गोवर रुबेला सदृश्य लक्षणे आढळलेली नाहीत. या सर्व्हेक्षणादरम्यान पात्र बालकांना जीवनसत्व अ चे डोस महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत.
सर्व्हेक्षणा दरम्यान ज्या पात्र बालकाचा गोवर रुबेलाचा डोस राहून गेला आहे अशांची यादी करुन या बालकांसाठी 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधील गोवर लसीकरणाच्या विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील 9 महिने ते 11 महिने वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचा पहिला डोस व 16 ते 24 महिने वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात यावा. तसेच जीवनसत्व अ चा डोस दिला नसेल, तर अशा पात्र लाभार्थीनी महापालिकेच्या नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयाची जळजळ, चेहऱ्यावरील आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येत असून लसीकरणामुळे हा आजार टाळता येणारा आहे. या आजाराची लक्षणे आढळलेस घाबरुन न जाता संबंधीतांनी महानगरपालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.
शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना देखील त्यांचेकडे ताप, पुरळ इत्यादी लक्षणे असलेला गोवर सदृष्य रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या