एक्स्प्लोर

40 एकरवर सभा, 80 एकरावर पार्किंग, जालन्यात जरांगेंची भव्य सभा; स्वागतासाठी फुलांनी भरलेले 140 जेसीबी

Manoj Jarange Jalna Sabha: नवीन मोंढा परिसरात 40 एकर मैदानावर ही भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तर 80 एकर जागा ही पार्किंगसाठी आहे. 

जालना : मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. 1  ते 12 डिसेंबर असा त्यांचा दौरा असेल. त्याआधी जरांगेच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच जालन्यात त्यांची एक जाहीर सभा होणार आहे. दुपारी एक वाजता या सभेचे आयोजन करण्यात आलंय. नवीन मोंढा परिसरात 40 एकर मैदानावर ही भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तर 80 एकर जागा ही पार्किंगसाठी आहे. 

जरांगेंच्या सभेआधी जालना शहरात त्यांच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेल्या 140 जेसीबी तयार ठेवल्या आहेत. याशिवाय व्यासपीठावर 100 फुटांचा भव्य पुष्पहार देखील क्रेनच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरु मनोज जरांगे आज काय बोलणार हे पाहावं लागेल. सभेनंतर जरांगेंचा मुक्काम अंतरवाली सराटीतच असेल.

कोणावर निशाणा साधणार?

मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हिंगोली येथील सभेतून भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे उद्याच्या सभेत जरांगे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात ऋषिकेश बेदरेला अटक करण्यात आली असून, यावर देखील आपण सभेत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आता बदलू नयेत असेही जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री यांच्याबद्दल देखील या सभेतून जरांगे आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.  

तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात 40 हजार चौरस फुटांचे होर्डीग्स आणि कटआऊट्स लावण्यात येणार असून सकल मराठा समाजाच्या बॅनर्सवर सर्व समाजातील थोर महापुरूषांचे फोटो लावण्यात येणार आहे. सभेत होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसोबतच सकल मराठा समाजाचे दहा हजार स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्हाभरातून तसेच अन्य ठिकाणावरून समाजबांधव मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.  

वाहतुकीत बदल...

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील पांजरपोळ मैदान येथे उद्या (1 डिसेंबर)  रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येवून मोटार सायकल रॅली काढणार आहेत. तरी, या मोटार सायकल रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतुकीचे नियमन व नियंत्रण होणे गरजेचे आहे. याकरिता खालील मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBadlapur Case : बदलापूर घटनेतील फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Embed widget