Santosh Danve: गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं; दानवेंचं प्रत्युत्तर
राज्यसभा निवडणुकीत संतोष दानवे माझ्यासोबत असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केली होता.
Rajya Sabha Election Result 2022: राज्यसभा निवडणुक आम्हीच जिंकणार असा दावा करत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप आमदार संतोष दानवे आमच्यासोबत असल्याचा दावा केला होता. मात्र सहाव्या जागेवर झालेल्या शिवसेनच्या पराभवानंतर संतोष दानवे यांनी सत्तार यांना प्रत्युत्तर दिले आहे. गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं, त्यांनी आम्हाला केलेल्या मदतीमुळे त्यांचे आभार मानतो असा खोचक टोला दानवे यांनी सत्तारांना लगावला आहे.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान या काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. असेच काही आरोप अब्दुल सत्तार यांनी संतोष दानवे यांच्यावर केले होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे माझ्यासोबत असणार असल्याचा सत्तार म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला संतोष दानवे यांनी सुद्धा उत्तर देत चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाले संतोष दानवे...
सत्तार यांना उत्तर देतांना दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत ते त्या पक्षात कधीच नसतात. म्हणून जे अपक्ष आमदार असतील त्यांना आमच्यासोबत घेण्यासाठी सत्तार यांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यामुळे आपण ज्या पक्षात असतो त्यांचासोबत कधीच नसतो हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. सत्तार यांचे तोंडच असे आहे की, ते बाजारात फिरतात. कोण कुठे गेलं,कुणाचे काय चाललं अशा बडबडीमुळे आम्हाला मदत मिळत असते. त्यामुळे अशाप्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली, अशीच मदत त्यांनी विधानपरिषदेच्या वेळी सुद्धा करावी, असा खोचक टोला संतोष दानवे यांनी सत्तार यांना लगावला आहे.
आम्हाला विश्वास होता...
यावेळी पुढे बोलताना संतोष दानवे म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार धनंजय महाडिक तिसऱ्या जागेवर निवडणून आले आहेत. आम्हाला विश्वास होताच, कारण आमचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते यांनी अतिशय नियोजन पद्धतीने हा विजय मिळवला असल्याच दानवे म्हणाले.