एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Crime: लग्न लागल्यानंतर नवरा म्हणाला मुलगीच पसंत नाही; मग काय, फटके...

Jalna News: पुरोहितांचे पैसे देण्यावरून वाद सुरु झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, एकमेकांची डोके फोडाफाडी झाली.

Aurangabad Crime News: वेगवेगळ्या कारणांनी लग्न मंडपातच लग्न तुटल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात लग्न लागल्यानंतर नवऱ्याने नवरीच पसंत नसल्याचं म्हणत तिला सोबत घेऊन जाण्यासा नकार दिला. मग काय संतापलेल्या मुलीकडील लोकांनी नवऱ्यासह वऱ्हाडाला धो-धो धूत परत पाठवले. तसेच नात्यातील एका मुलासोबत मुलीचं लग्न लावून दिले. 

भोकरदन तालुक्यातील एका मुलीचे मुंबईतील बच्छिरे कुटुंबासोबत लग्न जमले होते. बुधवारी साडेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त ठरवला. वरात निघणार तोच वऱ्हाडातील नवरदेवाचे तरुण मित्र यथेच्छ दारू पिले. त्यांनतर मानपानावरून वाद झाला. 12 वाजेच लग्न 3 वाजून सुद्धा लागत नव्हते. मुलीकडच्या लोकांनी विनवण्या केल्यानंतर कसेतरी लग्न लागलं. पण त्यांनतर पुन्हा मुलाकडच्या लोकांनी जेवणावरून गोंधळ घातला. त्यातच पुरोहितांचे पैसे देण्यावरून वाद सुरु झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, एकमेकांची डोके फोडाफाडी झाली. मग पोलीसही पोहचले. त्यांनतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करत पोलिसांच्या मदतीने वाद मिटवला आणि वऱ्हाड परत निघाले. 

मग काय, वऱ्हाडाला धो-धो धुतले...

पोलिसांनी समजूत काढल्यावर दोन्हीकडेच्या लोकांनी माघार घेत वाद मिटल्याच सांगितले. वरात परत निघाली. पण याचवेळी नवऱ्याने आपल्याला नवरी पसंत नसून, सोबत घेऊन जाणार नसल्याच म्हटलं. त्यामुळे संतापलेल्या मुलीकडच्या लोकांनी मुंबईहून आलेल्या नवऱ्यासह वऱ्हाडाला धो-धो धुतले. एवढच नाही तर सोबत आणलेल्या बसच्या काचा सुद्धा फोडल्या. तर अशा नवऱ्यासोबत आपणही नांदण्यास तयार नसल्याच वधूने सांगितले. त्यांनतर रात्री साडेनऊ वाजता मुलीच्या आत्याच्या मुलासोबतच तिचे लग्न लावण्यात आले. 

दारू महागात पडली...

वरात निघणार तोच वऱ्हाडातील नवरदेवाचे तरुण मित्र यथेच्छ दारू पिले. त्यामुळे वरात वेळेवर मंडपात पोहचलीच नाही. त्यात दारू पिल्याने वाद सरू झाले. आणि तेथून सुरु झालेला वाद अखेर लग्न तुटेपर्यंत सुरूच होता. त्यामुळे नवऱ्याच्या मित्रांनी पिलेली दारू त्यालाच चांगली महागात पडली. नवरी तर मिळाली नाही, मात्र पोटभर फटके मात्र खावे लागले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget