(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna News: कॉपीप्रकरणानंतर जालन्यात 69 रिक्त पदांसाठी आज कोतवाल परीक्षा, 16 केंद्रावर परीक्षेचे आयोजन
मागील वर्षी कॉफी प्रकरण उघड झाल्याने कोतवाल परीक्षा रद्द करण्यात आली होती.
Jalna news: आज जालना जिल्ह्यातील 16 केंद्रांवर कोतवाल पदासाठी फेर परीक्षा (Kotwal Exam reexam 2024) होणार आहे. जिल्ह्यातील 69 रिक्त पदांसाठी आज दुपारी ३.३० ते ५ या वेळेत ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मागील वर्षी कॉपी झाल्याचे उघड झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.
मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजी कोतवाल जागेच्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा दरम्यान काही उमेदवारांकडून कॉपी झाल्याचे उघड झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाहीर केले होते.
लाेकसभेच्या आचारसंहितेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अखेर आज सहा जुलै रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. या परीक्षेदरम्यान पुन्हा कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी उमेदवारांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी या परीक्षेदरम्यान आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून काही उमेदवारांनी कॉपी केल्याचे उघड झाले होते.
फेरपरीक्षेत हे विद्यार्थी पात्र
जालना जिल्ह्यातील 69 रिक्त जागांसाठी या जागा मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने काढल्या होत्या. जालन्यातील अंबड, घनसावंगी, जालना, बदनापूर, जाफराबाद, परतुर, भोकरदन तालुक्यासाठी ही रिक्त पदे होती. या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड झाल्याने पाच जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यानंतर परीक्षा पुन्हा होईल असे जाहीर करण्यात आले होते. या कॉपी प्रकरणात अडकलेले उमेदवार सोडून मागील वर्षीच्या परीक्षेसाठी हजर असणाऱ्या इतर उमेदवारांना फेर परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
हेही वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI