Dhangar Reservation Protest : धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला, जालना-धुळे सोलापूर महामार्ग अडवला, आंदोलकांनी पेटवले टायर
Dhangar Reservation : जालन्यात आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग अडवला असून, या ठिकाणी टायर जाळून प्रशासनाचा निषेध केला जात आहे.
जालना : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) आता धनगर आरक्षण (Dhangar Reservation) देखील अधिकच तापतांना पाहायला मिळत आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर (Jalna Collector Office) झालेल्या दगडफेकी प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने, आंदोलक आणखीनच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. जालन्यात आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग अडवला असून, या ठिकाणी टायर जाळून प्रशासनाचा निषेध केला जात आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा केंद्र देखील जालना जिल्हा बनताना पाहायला मिळत आहे.
जालना जिल्ह्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापतांना पाहायला मिळत आहे. सकाळपासून ठिकठिकाणी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, काही वेळेपूर्वी अचानक काही आंदोलक जालना-धुळे-सोलापूर महामार्गावर पोहचले. यावेळी, जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रस्त्यावरच टायर पेटवून दिले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापत असल्याचे चित्र आहे.
आंदोलकांचे शोले स्टाईल आंदोलन
आरक्षणाच्या मागणीसाठी जाळण्यात धनगर समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी जालन्यात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे. परतूर तालुक्यातील आनंद गाव येथे हे आंदोलन करण्यात आले. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. तर, पाण्याच्या टाकीवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतली असून, इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे. सोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून अज्ञात आरोपींची देखील ओळख पटवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: .