Jayant Patil : ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Politicis) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
Jayant Patil : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Politicis) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात जर सत्ता संघर्षाबाबतचा निकाल सरकार विरोधात गेला तर शिंदे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते. त्यामुळं मध्यावधी निवडणुका लागण्याऐवजी राष्ट्रपती राजवट (President rule) लागण्याची शक्यता असल्याचे पाटील म्हणाले. जयंत पाटील हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
Jayant Patil on State Govt : सरकार हे निवडणुका घेण्यास घाबरतंय
राज्यातील सध्याचे सरकार हे निवडणुका घेण्यास घाबरत आहे. त्यामुळं निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील असा या सरकारचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने झाली. त्यामध्ये काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे सरकारनं मागे घेतले पाहिजेत, असे जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil : आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार
ज्या ठिकाणी विधानसभा निवडणुका लढवतो, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी सध्या संवाद सुरु आहे. पक्षांतर्गत काही जबाबदाऱ्या आणि कामं देण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का? ती बघण्याचं काम देखील या दौऱ्यानिमित्त करण्यात येणार आहे. तसेच सभासद नोंदणी, पक्षांतर्गत निवडणुका संदर्भात चर्चा झाली. तसेच बुथ बांधणी संदर्भात चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरणार असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे पाटील म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुका आम्ही लढमार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळं याबाबत कोणी शंका उपस्थित करण्याची गरज नसल्याचे पाटील म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले होते. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी आम्ही केल्याचे जयंत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सभागृहातही मांडले आहेत आणि सभागृहाच्या बाहेरही मांडल्याचे पाटील म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन अनेकवेळा सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळं वेळोवेळी सभागृह तहकूब करण्यात आले होते. तसेच विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर शेतमाल आणत आंदोलनही केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: