Girish Mahajan: 'गिरीश महाजन यांच्या सासुरवाडीतही राष्ट्रवादीचा सरपंच'
Girish Mahajan: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गिरीश महाजन आपल्या सासूरवाडीतही भाजपचा सरपंच निवडून आणू शकले नाहीत
Girish Mahajan: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गिरीश महाजन आपल्या सासूरवाडीतही भाजपचा सरपंच निवडून आणू शकले नाहीत, या ठिकाणी आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच निवडून आल्याची टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे सासर असलेल्या जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच विजयी झाला. या ठिकाणी भाजपचे राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांच्यासारखे मोठे मोठे नेते आले होते. मात्र तरीही केवळ एकच सदस्य भाजपचा या ठिकाणी निवडून आला आणि इतर सदस्यांचा दारुण पराभव झाला आहे. गिरीश भाऊ तुम्ही तुमच्या सासुरवाडीतले सरपंच सुद्धा टिकवू शकले नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नुकत्याच जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या या निवडणुकीत जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आला. यावरून एकनाथ खडसेंनी पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. या ठिकाणी भाजपचे मोठे नेते म्हणजेच बेटी बचाव चे संपूर्ण देशाचे प्रमुख राजेंद्र फडके, महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्यासारखे मोठे मोठे नेते आले. मात्र तरीही या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लोकनियुक्त सरपंच म्हणून जनतेतून निवडून आला. गिरीश भाऊ त्यांच्या सासूर वाडीतील सरपंच सुद्धा टिकवू शकले नाहीत, अशी जोरदार टीका एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.
मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा -
चाळीसगावातील एका शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांच्या समर्थकाचा पराभव झाला, यावरून एकनाथ खडसेंनी मंगेश चव्हाण यांना टीकेचे लक्ष केले आहे. मंगेश चव्हाण ज्या ठिकाणी पाय ठेवतात त्या ठिकाणी भाजपचा पराभव होतो. एखाद्या राष्ट्रीय नेत्याप्रमाणे ते मुक्ताईनगर झाले मात्र या ठिकाणीही एकही ग्रामपंचायतवर भाजपला विजयी करू शकले नाहीत, असा टोलाही एकनाथ खडसेंनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांना लगावला आहे.