जळगाव : जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात पर्धाडे गावाजवळ प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेस गाडीसोबत मोठी दुर्घटना अगदी थोडक्यात टळलेली आहे. भरधाव एक्स्प्रेसला जेसीबी मशीनचा धक्का लागला त्यानंतर जेसीबी मशीन फेकले गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आज दुपारी जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात पर्धाडे गावा जवळ घडली आहे.
परधडे गावा परिसरातील रेल्वे स्थानकाजवळ सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात येत होता. या दरम्यान जेसीबीचे काम सुरू असताना रेल्वे मार्गावरून भरधाव वेगाने कामाख्या एक्सप्रेस जात होती. चालकाने हॉर्न वाजून जेसीबी चालकाला सूचना देण्याचा प्रयत्न केला मात्र जेसीबी चालकाच्या लक्षात येईपर्यंत भरधाव वेगात धावणारी कामाख्या एक्सप्रेस जेसीबी मशीनच्यां पुढच्या भागावर जाऊन आदळली. यावेळी मोठा आवाज होऊन जेसीबी मशीन रेल्वेसोबत ओढले गेले आणि काही अंतरावर फेकले गेले.
घटनेचे गांभीर्य कळताच चालकाने रेल्वे थांबवली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जेसीबी मशीनसह रेल्वे इंजिनचे नुकसान झाल्याने रेल्वे इंजिन बदलून पुन्हा एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली मात्र या घटनेने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनं रेल्वे स्थानक परिसरात चांगली खळबळ उडाली आणि प्रवाशांची धावपळ सुरू झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. दिवसेंदिवस रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. रेल्वे रुळावर बेफिकीर वावरणाऱ्या परिसरातील नागरिकांचा यात हकनाक बळी जात आहे.
संबंधित बातम्या :