हैदराबाद: आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात रेल्वेखाली येऊन पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. रेल्वे ट्रॅकवर बराच उशीर थांबल्यानंतर त्यातून प्रवासी बाहेर आले. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन येणाऱ्या भरधाव रेल्वेने त्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


रेल्वे बराचवेळ मधेच थांबल्यानंतर त्यातील प्रवासी बाहेर आहे. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या रेल्वेने त्यातील पाच जणांना चिरडले. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी मृतांच्या प्रेतांचे दृष्य दिसत आहे. 


 






मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनात याची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की सिगडाम मंडलच्या बातूवा परिसरात हा अपघात झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृत व्यक्ती आणि त्यांच्या परिवारांवर कोसळलेल्या आघातावर शोक व्यक्त केला आहे. तर जखमींवर तात्काळ आणि योग्य तो उपचार करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला आहे.  


विशाखापट्टनमपासून गुवाहाटीकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही गाडी ट्रॅकवरच थांबली होती. ही गाडी बराच वेळ या ठिकाणी उभी होती. यावेळी उकाड्याच्या त्रासाने हैराण झालेले प्रवासी गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून गतीने जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


ABP Majha